असुरक्षित होत चाललेली मुंबई !

मुंबईकर जागे रहा !

‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला, जो मुंबईकरांसाठी अतिशय धक्कादायक असा होता. ‘बांगलादेश आणि म्यानमार येथून बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून वाढेल’, असे या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंची मुंबईतील भयावह स्थिती ‘मुंबईकर जागते रहा !’, या लेखमालेच्या माध्यमातून दर्शवत आहोत.

२५ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता, घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी आणि हिंदूंनी सुरक्षित मुंबई आणि सुरक्षित भारत यांसाठी प्रयत्न करावा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

भाग २.

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/857629.html

१. मुंबईतील हिंदू घाबरला आहे का ?

‘मुंबईतील हिंदू घाबरला आहे. होय हे खरे आहे… मुंबईतील हिंदू स्वतःला सुरक्षित समजत नाही. तो सतत दडपणाखाली वावरत आहे. पूर्वी मुंबईतील हिंदू ताठ मानेने चालायचा; पण आज मात्र परिस्थिती पूर्ण पालटलेली आहे. तुम्ही कधी मालाडच्या मालवणी भागात गेला आहात का ? मी गेलो आहे. तेथील परिस्थिती काश्मीरप्रमाणे भीषण झालेली आहे. पूर्वी मालवणी हा परिसर पुष्कळ शांत आणि सुंदर होता. आता मात्र हा परिसर भकास झाला आहे. ‘कोळी बांधवांचे सुंदर बेट’ म्हणून ओळखली जाणारी मालवणी आज अनधिकृत वस्त्या, गुन्हेगारांचे माहेरघर आणि जिहाद्यांचा अड्डा झालेला आहे. शेजारच्यांना त्रास देणे, दोन इमारतींच्या मध्ये बकरी कापणे, मुलींना छेडणे असे अपप्रकार तिथे होत आहेत. तेथील मूळ निवासी लोक स्वतःची घरे विकत आहेत आणि विकत घेणारे हे मोठ्या प्रमाणात मुसलमान आहेत. मुली, बायका शौचालयात गेल्या की, तिथे धर्मांध विकृत घाणेरडे व्हिडिओ बघत बसतात. टिंगल करतात. त्यामुळे महिलांचे हाल होतात. त्यांना लाजल्यासारखे वाटते. हा एक प्रकारचा मानसिक अत्याचारच आहे. गुंडांना कुणी काही बोलले की, ५० ते १०० गुंडांचा समूह धावून येतो. त्यामुळे स्थानिक हिंदू त्यांना घाबरून रहातात. तिथे हिंदू मुलांना नशेची सवय लावली जाते. ‘ड्रग्ज’च्या (अमली पदार्थांच्या) मेजवान्या चालतात. पूर्वी गरबा, गणेशोत्सव थाटात व्हायचा, आता घरात घंटी वाजवली, तरी त्यांना त्रास होतो. ‘घंटा नका वाजवू’, अशा धमक्या दिल्या जातात; पण मशिदीवरील भोंगे आणि बांग मात्र हिंदूंनी गुपचूप ऐकायची, असा तेथील अघोषित मोगलशाही कायदा आहे.

२. काश्मीरची दहशत विसरता येणार नाही !

१९ जानेवारी १९९०च्या रात्री काश्मीरमधील मशिदींमध्ये ध्वनीक्षेपकावरून घोषणा केली, ‘काश्मिरी पंडित पुरुषांनी काश्मीर खोर्‍यातून निघून जावे आणि त्यांच्या बायकांना मात्र मागे ठेवावे.’ पाक समर्थकांनी काश्मीरच्या रस्त्यांवर आझादीच्या घोषणा दिल्या. त्या काळात अनेक प्रमुख हिंदु नेत्यांच्या कत्तली झाल्या. कत्तलीचे दायित्व ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ने स्वीकारले. फुटीरतावादी यासिन मलिक आणि बिट्टा कराटे हे या घटनेचे सूत्रधार होते. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटने हवाई दलाच्या ४ निःशस्त्र कर्मचार्‍यांना मारून टाकले. तत्कालीन केंद्रीय मंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या कन्येचे अपहरण केले.’

३. ‘भगवा आतंकवाद’ म्हणून हिंदूंना कलंकित करण्याचे षड्यंत्र

तत्कालीन सरकार आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांचा करंटेपणा पहा, २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीचे आक्रमण पाकिस्तानने केले होते; परंतु स्वतःच्या नाकर्तेपणावर पडदा टाकण्यासाठी सरकारने आणि हिंदुद्वेषाने पछाडलेल्या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी ‘भगवा आतंकवाद’ नावाची खोटे कथानक मांडले.

सहिष्णू हिंदूंना मुद्दामहून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले; पण तुकाराम ओंबळे या राष्ट्रभक्त पोलिसाने कसाबला जिवंत पकडल्यामुळे हे कथानक चुकीचे ठरले. आज काँग्रेसला मतांसाठी हिंदूची आठवण होत आहे. ‘आम्ही कसे हिंदु धर्माचे पालन करतो, जानवे घालतो’, हे दाखवण्यासाठी त्यांनी (काँग्रेसचे राहुल गांधी यांनी) आता पुढाकार घेतलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगूनच ठेवलेले आहे, ‘उद्या मतांसाठी काँग्रेसजन कोटाच्या वर जानवे घालतील.’ सावरकर किती द्रष्टे होते. त्यांना या लोकांची नस माहिती होती.

४. मुंबई सुरक्षित नाही; कारण… ! 

वर्ष १९९३ची दंगल आपण कुणीच विसरू शकणार नाही. अनेकांनी ती दंगल अनुभवलेली असेल. ती एक भीषण दंगल होती. अशा अनेक दंगली भारतात मुद्दामहून घडवण्यात आलेल्या होत्या. कारसेवकांनी बाबरी ढाचा पाडल्यानंतर हिंदूंनी भरलेली रेल्वे जाळण्यात आली. अनेक हिंदू भस्मसात् झाले; पण कमाल म्हणजे त्यावर कुणी ‘ब्र’सुद्धा काढला नाही; कारण एकच ‘हिंदू मरता हे तो मरने दो’ (हिंदु मरत असेल, तर मरू दे), ही रणनीती तेव्हाच्या आणि आताच्या माध्यमांनी स्वीकारलेली आहे. मुंबई दंगलीची पार्श्वभूमी सांगतांना अनेक स्वयंघोषित पुरोगामी पत्रकार यास ‘बाबरी ढाचा विध्वंस’, असे कारण सांगतात. म्हणजे काय ? तर कारसेवकांनी बाबरी ढाचा पाडला; म्हणून मुसलमानांच्या भावना दुखावल्या आणि मग दंगली झाल्या; पण हे धादांत खोटे आहे. विशिष्ट समाजाचे धार्मिक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दंगली घडवल्या जातात.

अ. १२ मार्च १९९३ या दिवशीची दंगल : ही मुंबई दंगल भीषण होती. मस्जिद बंदर भागात दोघा माथाडी कामगारांना भोसकण्यात आल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. या दंगलीच्या मागे दाऊदचा हात असल्याचेही समोर आले आहे. यात एकूण ९०० नागरिक मारले गेले.

आ. ११ जुलै २००६ या दिवशीचा बाँबस्फोट : ११ जुलै २००६ या दिवशी मुंबईची जीवनवाहिनी, म्हणजेच रेल्वे बाँबस्फोटाने हादरली. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या ७ स्थानकांवर बाँबस्फोट झाले होते. यामध्ये ‘प्रेशर कुकर बाँब’चा वापर करण्यात आला होता.

२०९ निष्पाप मुंबईकर ठार झाले आणि ७१४ जण गंभीर घायाळ झाले.

इ. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी जिहादी दहशतीच्या क्रौर्याची परिसीमा : दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज, महाल पॅलेस अँड टॉवर, ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी जिदाही आक्रमणे झाली. या ठिकाणी जिहाद्यांनी निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबाँब फेकले. हे भीषण आक्रमण २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत सलग २ दिवस चालले. या आक्रमणात ३४ परदेशी नागरिक, तर १९७ जण ठार झाले. ‘पर्यटकांसाठी मुंबई सुरक्षित नाही. आम्ही मुंबईला कधीही वेठीस धरू शकतो. मुंबई ही आमची जहागीर आहे. ती लवकरच नेस्तनाबूत करू’, हाच संदेश या जिहादी आतंकवाद्यांना द्यायचा होता.

ई. आझाद मैदान दंगल : ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी काही धर्मांध मुसलमानांनी आझाद मैदान येथे दंगल घडवून आणली. आसाममध्ये घुसखोरांच्या विरोधात बोडो संघटनेने आंदोलन केले, त्याचा वचपा काढण्यासाठी रझा अकादमीने अझाद मैदान जवळ दंगल घडवून आणल्याचे आरोप आहेत. मुळात या लोकांनी आझाद मैदानात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. केवळ १५०० आंदोलक जमा होतील, असे अनुमान होते; पण शुक्रवारचा दिवस असल्याने जवळजवळ ४० सहस्र लोक आझाद मैदानात जमा झाले होते.

या जमावाने जाळपोळ केली, लुटालूट केली, महिला पोलिस कर्मचार्‍यांचा विनयभंग केला. यात २ निष्पाप जिवांना प्राण गमवावा लागला आणि कितीतरी लोक घायाळ झाले, यात ५८ पोलीस होते.

२ कोटी ७४ लाख रुपयांची हानी झाली; पण स्वयंघोषित पुरोगाम्यांना तर भगवा आतंकवाद दिसतो. कमाल आहे नाही का ? या दंगलखोरांनी ‘अमर जवान ज्योती स्मारका’ची नासधूस केली.’

(क्रमशः)

– मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.

भाग ३. वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/858066.html