मुंबईकर जागते रहा !

आजपासून प्रतिदिन वाचा लेखमाला !

‘नुकतेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला, जो मुंबईकरांसाठी अतिशय धक्कादायक असा होता. ‘बांगलादेश आणि म्यानमार येथून बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून वाढेल’, असे या अहवालात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंची मुंबईतील भयावह स्थिती दर्शवणारी ‘मुंबईकर जागते रहा !’, ही लेखमाला प्रतिदिन चालू करत आहोत.

बांगलादेशाच्या सीमेवर वसलेले राज्य म्हणून आसाम, त्रिपुरासह पूर्वाेत्तर भारतातील राज्यांनी आजवर जे सहन केले, ते या पुढील काळात मुंबईसारख्या प्रगत शहराच्या वाट्यास येऊ नये, याकरता हा लेख लिहिण्याचा प्रयत्न !

१. आसामप्रमाणे मुंबईत घुसखोरीच्या धोक्याची शक्यता

अल्पसंख्यांक समाज आसाममध्ये आज बहुसंख्येने वाढत असून त्यांचा वाढत चाललेला संचार आजवर आसामसाठी धोक्याची घंटा होती; परंतु मागच्या ५ वर्षांच्या काळात याला काही मर्यादा आलेल्या आहेत. आसामप्रमाणे मुंबईच्या संदर्भात घुसखोरीच्या एका मोठ्या धोक्याची चर्चा करावी लागत आहे. हे लेखन केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर मत मांडलेले नसून मुंबईतील प्रत्यक्ष पहाणी करून आणि स्वतः माहिती घेऊन लेखन केले आहे. आसामने आजवर जे भोगले, ते भयावह होते; परंतु अशा प्रकारच्या विषयांवर दबक्या आवाजात बोलत रहाण्यातच आपण बहुतेक वेळा खूश असतो. असे असले, तरी प्रत्यक्ष त्या भागात जाऊन समक्ष माहिती घेणे आवश्यक असते, हे आपल्या लक्षात येत नाही.

आसामची एकूण लोकसंख्या आणि त्यात असलेले घुसखोरांचे प्रमाण यांचे गुणोत्तर पुष्कळ मोठे होते. त्यामुळे स्थानिक आणि मूळ आसामी हिंदू नागरिकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. जे काश्मिरी हिंदूंचे झाले, तेच आसाममध्येही होत होते. या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या महाकाय नगराचे भीषण वास्तव लक्षात घेतले पाहिजे. मुंबईकरांनी वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे.

२. घुसखोरांमुळे मुंबईची होत असलेली हानी

सुरक्षित जगता येणे, हा प्रत्येक मुंबईकर नागरिकाचा मूलभूत हक्क आहे; परंतु शहरानेही आजवर अनेक कटू अनुभव पचवले. आसामसारखी घुसखोरी मुंबईकरांच्या हक्कांवर टाच आणू पहात आहे. दुसरीकडे ‘स्लीपर सेल’ (छुपे गट) कुठे तैनात असतील ?

हे आपण सांगू शकत नाही.   वर्ष १९९३ पासून चालू झालेले बाँबस्फोट असोत अथवा २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेले दुर्दैवी आतंकवादी आक्रमण असो, या सर्वांच्या मागे ही घुसखोरीच होती. मुंबईने त्यापायी अतोनात यातना सोसल्या असून सहस्रो निरपराध नागरिक ठार झाले आहेत; परंतु आता तरी हे थांबायला हवे !

३. आसामची स्थिती आणि तेथे होत असलेला पालट

आसाममध्ये वर्ष २०१४ पूर्वी हिंदु सुरक्षित नव्हता, खून आणि बलात्कार यांसारख्या घटना दिवसाढवळ्या घडत असत. हिंदु समाजातील लोकांच्या भूमी, रहाते घर बळकावण्याचे काम या ठिकाणी सर्रास झाले. त्यासह बांगलादेशात रहाणार्‍या हिंदूंनाही असेच अत्याचार सहन करावे लागले; परंतु नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया यांसारखे कायदे आल्यामुळे हिंदूंच्या पाठीशी आजचे केंद्र सरकार ठामपणे उभे आहे.

४. मुंबईत परकीय शक्तींनी देशविरोधी कारवाया करणे 

२ शतकांपूर्वी अफगाणिस्तान आणि हिंदुकुश भारतापासून वेगळे झाले. ७७ वर्षांपूर्वी पाकिस्तान वेगळा झाला. ५० वर्षांपूर्वी बांगलादेश अस्तित्वात आला. अजून किती परकीय संकटे या भारतभूमीवर येऊ द्यायची आहेत ? याचा विचारही आपणच करायचा आहे ! मुंबईसारखे शहर आणि तेथील अनेक भागात अल्पसंख्यांक नावाची झूल पांघरून काही परकीय शक्ती देशविरोधी कारवाया करत असतील, तर हे वेळीच थांबले पाहिजे अन् याचा प्रारंभ मुंबईकरांनी स्वतःपासून करायचा आहे. मुंबईकरांनो वेळीच जागे व्हा ! अजूनही वेळ गेलेली नाही !’

– स्वामी सत्स्वरूपानंद

(क्रमश:)

‘सुरक्षित मुंबई’ आणि ‘सुरक्षित भारत’ यांसाठी हिंदूंनी प्रयत्न करावा !

‘द कश्मीर फाइल्स’, हा चित्रपट बघून मला समजले की, भारतात केवळ आसामनेच नव्हे, तर काश्मीरच्या जनतेने माझ्याहून अधिक दुःख भोगले आहे. त्यांचे तर सगळेच उध्वस्त झाले; पण हे ऐकून, जाणून आणि समजून अजून आश्चर्य वाटले की, आपण ज्या गैरसमजात हे समजून होतो की, आसामची आग आपण विझवली, काश्मीरमध्ये कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) हटवले, म्हणजे भारत आता आतंकवादी, घुसखोर, बांगलादेशी लोकांचा शिकार होणार नाही; परंतु काही दिवसांपूर्वी मी मुंबईला फिरायला गेलो होतो. मी केवळ ३ दिवसांसाठी गेलो होतो; परंतु ७ दिवस मुंबईला राहिलो आणि जेव्हा तेथील एक एक वस्ती फिरून आलो, तेव्हा समजले की, मुंबईत कुठे काश्मीरसारखी घटना घडत आहे, तर कुठे बंगाल निर्माण होत आहे आणि कुठे जसे आसाममध्ये घुसखोर शिरले, तसे इथेही तेच होत आहे. जे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये केले, जे ओसामा बिन लादेनने केले, कसाब मुंबईत घुसू शकला, दाऊद देशाच्या बाहेर राहूनही मुंबईत आतंकवादाचे षड्यंत्र रचत आहे. या सर्वांसमोर आपण भारतीय इतके कमकुवत का झालो आहोत ? आपण त्या पूर्वजांचे वंशज आहोत, ज्यांनी कोणत्याही दबावासमोर स्वतःचा धर्म पालटला नाही. त्यामुळेच आजही आपण हिंदु आहोत. हिंदू जोपर्यंत रहाणार, तोपर्यंत स्वतःसाठी नाही, तर येणार्‍या पिढीसाठी एक ‘सुरक्षित मुंबई’ असावी आणि ‘सुरक्षित भारत’ असावा’, यांसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !’

– मोहेश कुर्मी, सिवसागर, थोवरा, आसाम.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी स्वतःसाठी नाही, तर येणार्‍या पिढीसाठी एक ‘सुरक्षित मुंबई’ आणि ‘सुरक्षित भारत’ यांसाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !