८ वर्षे झोपलेले हिंदू ! पालकांनी आक्षेप घेतला नसता, तर शाळेचे प्रशासन अजूनही झोपलेले असते ! अशी शाळा विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या लायकीची आहे का ?

प्रतीकात्मक चित्र

‘कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील जाधववाडी परिसरातील महापालिकेच्या एका शाळेत गेल्या काही दिवसांपासून हिंदी प्रार्थनेद्वारे इस्लाम धर्माचा छुप्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होता. ही प्रार्थना शाळेत विद्यार्थ्यांकडून म्हणून घेण्यात येत होती. यात ‘तू डर मत बंदे, मुश्कीलोसे कहेना-मेरा खुदा बडा है’, अशा आशयाचे बोल होते. हे लक्षात आल्यानंतर या संदर्भात २१ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संतप्त पालक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारला. यावर मुख्याध्यापकांनी ‘गेल्या ८ वर्षांपासून ही प्रार्थना शाळेत होत आहे. यावर आता पालकांनी आक्षेप घेतल्याने ती यापुढे घेण्यात येणार नाही’, असे लेखी पत्र दिले.

विद्यार्थिनींना टिकली, तर विद्यार्थ्यांना अष्टगंध लावण्यास मनाई !

या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले म्हणाले, ‘‘शाळेत विद्यार्थिनींना टिकली लावण्यास मनाई केली जाते, तर मुलांना अष्टगंध लावू दिले जात नाही. हे धक्कादायक आहे.’’