|
इंदूर (मध्यप्रदेश) : येथील छत्रीपुरा परिसरात १ नोव्हेंबरला ९ वर्षांची मुलगी फटाके फोडत होती. तिने फटाके फोडल्यामुळे धर्मांध मुसलमानांनी त्यावरून वाद चालू केला. या वादाचे रूपांतर दगडफेक आणि जाळपोळी यांत झाले. दंगलखोरांनी १२ वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या, तर ५ वाहने पेटवून दिली.
१. मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, धर्मांध मुसलमानांनी फटाके फोडल्याच्या छोट्या गोष्टीवरून वाद उकरून काढला. त्यांनी बलपूर्वक घरात घुसण्याचा प्रयत्न केला. घरातील गरोदर महिलेशी त्यांनी गैरवर्तन केले.
२. वाद चालू झाल्यावर काही वेळाने पोलीस आले. पोलीस दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत अल्याने त्यांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांतून अधिक कुमक मागवली. तोपर्यंत धर्मांध मुसलमान पोलिसांसमोरच तोडफोड आणि जाळपोळ करत होते.
३. पोलीस आयुक्त हृषीकेश मीणा यांनी सांगितले की, दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल.
४. अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सिंहही घटनास्थळी पोचले. त्यांनी सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी लहान मुलांना फटाके फोडण्याचेही आवाहन केले.
संपादकीय भूमिका
|