Assam Gangrape Accused Died : आरोपी तफाझुल इस्‍लाम याचा पोलिसांच्‍या कह्यातून पळून जातांना तलावात पडून मृत्‍यू

आसाम येथील अल्‍पवयीन हिंदु मुलीवरील सामूहिक बलात्‍काराचे प्रकरण

आरोपी तफाझुल इस्‍लाम

नागाव (आसाम) – नागाव जिल्‍ह्यातील धिंग परिसरात एका १४ वर्षीय हिंदु मुलीवर झालेल्‍या सामूहिक बलात्‍कार प्रकरणात तिघांची नावे समोर आली होती. यामध्‍ये केवळ तफाझुल इस्‍लाम या आरोपीला अटक करण्‍यात आली होती. पोलीस आरोपीला घटनास्‍थळी घेऊन जात होते, तेव्‍हा त्‍याने पळून जाण्‍याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्‍याने तलावात उडी मारली; परंतु त्‍याचा मृत्‍यू झाला. तलावात त्‍याला शोधण्‍यासाठी पोलिसांनी तत्‍काळ राज्‍य आपत्ती निवारण पथकाला पाचारण करून त्‍याचा मृतदेह बाहेर काढला. ज्‍या हवालदाराने त्‍याला बेड्या ठोकल्‍या होत्‍या, त्‍यालाही दुखापत झाली आहे. उपचारांसाठी त्‍याला रुग्‍णालयात पाठवण्‍यात आले आहे.

१० वीमध्‍ये शिकणारी पीडित मुलगी रात्री ८ च्‍या सुमारास शिकवणी संपवून सायकलवरून घरी परतत असतांना मोटारसायकलवरून आलेल्‍या तिघांनी तिच्‍यावर बलात्‍कार केला. बलात्‍कारानंतर तिला घायाळ आणि बेशुद्धावस्‍थेत एका तलावाजवळ रस्‍त्‍याच्‍या कडेला सोडून दिले. स्‍थानिकांनी तिला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. या घटनेच्‍या विरोधात मोठ्या संख्‍येने जनता रस्‍त्‍यावर उतरली त्‍यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्‍याची मागणी केली.

विशिष्‍ट समाजातील लोकांना अशा प्रकारच्‍या गुन्‍ह्यांसाठी चिथावले जात आहे ! – मुख्‍यमंत्री सरमा

या घटनेविषयी मुख्‍यमंत्री हिमंत बिस्‍व सरमा म्‍हणाले की, हिंदु मुलींसमवेत असा जघन्‍य गुन्‍हा करण्‍याचे धाडस करणार्‍या गुन्‍हेगारांना कायदा सोडणार नाही. लोकसभेच्‍या निवडणुकीनंतर एका विशिष्‍ट समुदायातील एक घडक अतिशय सक्रीय झाला आहे आणि त्‍यांना अशा प्रकारचा गुन्‍हा करण्‍यास चिथावले जात आहे; मात्र आम्‍ही गुन्‍हेगारांवर कडक कारवाई करू. कुणालाही सोडले जाणार नाही.

संपादकीय भूमिका

निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, मुसलमानांचे लांगूलचालन करणारे आता या घटनेवरून भाजप सरकारवर टीका करून ‘ही जाणीवपूर्वक केलेली हत्‍या आहे’, असा आरोप करतील !