सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वाराणसी आश्रमातील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी वाराणसी आश्रमातील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

याच्या आधीचा भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/819755.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

६. सौ. मीरा राजन केसरी

६ अ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव रथावर विराजमान असतांना त्यांच्या ठिकाणी ‘साक्षात् विष्णुस्वरूपात श्रीकृष्ण आणि नंतर शिव नटराज स्वरूपात रथावर विराजमान आहे’, असे जाणवणे : ‘जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव रथावर विराजमान होते, तेव्हा ‘साक्षात् विष्णुस्वरूपात श्रीकृष्ण रथावर विराजमान आहे’, असे मला वाटले. ते थोड्या वेळासाठी आपल्या डाव्या पायावर उजवा पाय ठेवून बसले होते. तेव्हा ‘शिव नटराज स्वरूपात रथावर विराजमान आहे आणि या मनमोहक रूपाला पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

६ आ. ‘स्वतः रथ ओढत आहे’, असे जाणवणे : साधकांद्वारे बनवलेला मंदिर स्वरूपातील रथ जेव्हा साधक ओढत होते, तेव्हा माझा भाव एवढा जागृत झाला की, ‘मलाही त्यांचा रथ ओढण्याचे सौभाग्य मिळाले आहे आणि मीसुद्धा तो रथ ओढत आहे’, असे मला वाटले.

६ इ. तिन्ही गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे : रथावर विराजमान होऊन सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवजी, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ सर्व साधकांकडे पहात होते. त्यांना जेव्हा भावाश्रू येत होते, तेव्हा ते दृश्य पाहून माझ्या अंतःकरणात कृतज्ञताभाव जागृत झाला. त्या वेळी वाटले की, ‘तिन्ही गुरु आपल्या साधकांवर किती प्रेम करतात ! त्यांचे सर्व साधक प्रत्यक्षात श्रीमन्नारायणाचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत.’

‘तिन्ही मोक्षगुरूंनी आपल्या साधकांना हे दिव्य दर्शन देण्यासाठी एवढे श्रम घेऊन एवढे मोठे नियोजन करून आपल्या साधकांना बोलावले’, यावरून त्यांची प्रत्यक्ष प्रीती अनुभवता आली.

६ ई. सर्व साधक, सर्व संत आणि सर्व सद्गुरु यांच्यामुळे साधनारत असल्यामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : जेव्हा श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) सर्व साधकांचा एकेक करून परिचय करून देत होते, तेव्हा प्रत्येक साधकाप्रती कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी मी मानस प्रणाम करत होते की, ‘त्या सर्व साधकांमुळे आणि सनातनच्या प्रत्येक साधकामुळेच आज सनातन संस्था आहे अन् संस्थेचे कार्य चालले आहे. त्यामुळे माझ्या साधनेला गती मिळत आहे. तेव्हा ‘मी साधना करू शकत आहे’, यासाठी सर्व साधकांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती.

६ उ. आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद यांच्याप्रती कृतज्ञता जाणवणे : अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी जेव्हा प्रसादाविषयी सांगितले की, त्यांना अधून मधून आश्रमातून प्रसाद मिळतो. तो खाऊन त्यांना ऊर्जा शक्ती मिळते आणि ते धर्मसेवा करू शकतात. त्यांचा तो भाव पाहून माझी भावजागृती झाली आणि मला शिकायला मिळाले की, ‘आम्हाला तर आश्रमात गुरुदेव प्रत्येक वेळी प्रसाद-महाप्रसाद देतात, तर माझा कृतज्ञताभाव अन् श्रद्धा किती अधिक असायला पाहिजे ! ती माझ्यामध्ये बाणवण्यासाठी या सूत्राच्या माध्यमातून मला बळ मिळाले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

७. श्री. रूपेश गोकर्ण

७ अ. श्रीसत्‌शक्ति श्रीचित्‌शक्ति श्री सच्चिदानंद ।

श्रीसत्‌शक्ति श्रीचित्‌शक्ति श्री सच्चिदानंद ।
विनायक भैया के वर्णन से सभी साधक को हुआ परमानंद ।। १।।

ब्रह्मोत्सव यज्ञ में विनायक भैया का सूत्रसंचालन ।
उससे हुआ सभी साधकों में भक्तिभाव, चैतन्य का संचारण ।। २।।

विनायक भैया की है गुरु पर अपार श्रद्धा-भक्ति ।
विनायक भैया से मिली सभी साधकों को प्रेरणा और शक्ति ।। ३।।

नाडीपट्टी में है गुरुदेवजी का रहस्य सप्तर्षिंयों के माध्यम से ।
नाडीवाचक बताते हैं विस्तृत जानकारी विनायक भैया के माध्यम से ।। ४ ।।

गुरुदेव जी के चरणों में विनायक भैया करते हैं ।
शरणागतभाव एवं आर्तता से प्रार्थना ।
हम सभी साधकों को विनायक भैया जैसी भाव भक्ति दीजिए ।
यही गुरुदेवजी के चरणों में हमारी प्रार्थना ।। ५।।

टीप : विनायक भैया – श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे)

७ आ. ‘भक्तासाठी भगवंत आणि भगवंतासाठीच भक्त आहेत’, हे प्रत्यक्ष अनुभवणे : ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम संगणकीय प्रणालीद्वारे प्रत्यक्ष पहातांना मला वाटले की, मी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी आहे. ‘भगवान श्री विष्णु आणि महालक्ष्मीदेवी रथात बसले आहेत’, अशी मला अनुभूती आली. विनायकदादाच्या सूत्रसंचालनामुळे भावजागृती झाली आणि ईश्वरी चैतन्य ग्रहण होत होते. ‘भक्तासाठी भगवंत आणि भगवंतासाठीच भक्त आहेत’, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. साधकांना पाहून गुरुदेवांची भावजागृती होत होती आणि गुरुदेवांना पाहून साधकांची भावजागृती होत होती. ब्रह्मोत्सवाचे वातावरण भावपूर्ण होते.

७ इ. प्रत्यक्ष यज्ञस्थळी नसूनही ‘यज्ञाच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होत आहे’, असे अनुभवणे : चंडीयागाच्या वेळी तिथे उपस्थित असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मुखावर देवीचे तेज दिसत होते. त्यांना पाहून मनाला शांती आणि आनंद वाटत होता. प्रत्यक्ष यज्ञ स्थळी नसूनही, ‘मी यज्ञासमोर बसलो आहे. यज्ञाच्या धुरामुळे माझ्या डोळ्यांची जळजळ होत आहे’, असे मी अनुभवत होतो. यज्ञात श्री. विनायक शानभाग आणि श्री. निषाददादा (श्री. निषाद देशमुख, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या सूत्रसंचालनामुळे दैवी लीला अनुभवायला मिळाली. दोघांच्या वाणीतून गुरुदेवांचे चैतन्य मिळत होते.

‘गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मला अखंड आपल्या चरणी स्थान द्यावे. आपल्याला अपेक्षित अशी सेवा-साधना आपणच माझ्याकडून करून घ्या. आपणच माझा हात पकडून गुरुकृपायोग मार्गाने मला पुढे घेऊन जावे, हीच आपल्या कोमल चरणी कृतज्ञतापूर्वक आणि भक्तीभावपूर्वक प्रार्थना आहे.’

८. सौ. एकता सेठ

८ अ. ‘स्वतःसह श्रीहरि गुरुरूपात असल्यामुळे चिंता करायला नको’, असे वाटणे : ‘विशाल मैदानात झालेला ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर असून तो ईश्वराच्या विशालतेची अनुभूती देत होता. गुरुदेवांना पाहून भावाश्रू आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा अधिवक्ता कृष्णमूर्ती (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) स्वत:ची अनुभूती सांगत होते, तेव्हा माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. संपूर्ण कार्यक्रम पाहून मला हे शिकायला मिळाले की, ‘मी कशाला चिंता करू, जेव्हा माझ्यासह श्रीहरि गुरुरूपात आहेत. सर्वकाही त्यांच्यावर सोपवून सर्व प्रसंगांना सामोरे जायचे आहे.’

९. सौ. सानिका संजय सिंह

९ अ. पुष्कळ कृतज्ञता वाटून अखंड भावाश्रू येणे : ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रथामधून करुणामय दृष्टीने सर्व साधकांना पहात होते. ते पाहून माझे मन कृतज्ञताभावाने भरून आले. आम्हाला अखिल ब्रह्मांड चालवणारे भगवान श्रीविष्णु गुरुरूपात लाभले आहेत. त्यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. भावाश्रू थांबता थांबत नव्हते. आम्हाला आनंद देण्यासाठी प्रत्येक क्षणी कार्यरत असणार्‍या गुरुदेवांना पुनःपुन्हा प्रार्थना होत होती की, ‘माझे मन आणि बुद्धी यांवर जे स्वभावदोष-अहंरूपी मायेचे आवरण आहे, ते आपणच नष्ट करावे. आपल्या चरणी संपूर्ण समर्पण करून घ्यावे.’ कार्यक्रम संपल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत माझे मन शून्यावस्थेत होते.’ (समाप्त)

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक