Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !

खासदार असदुद्दीन औवेसी

नवी देहली – संसदेचे पावसाळी अधिवेशन २४ जूनपासून चालू झाले आहे. सध्‍या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. अनेक खासदार शपथ घेतल्‍यानंतर ‘वन्‍दे मारतम्’, ‘भारत माता की जय’ यांसारख्‍या घोषणा देत आहेत. त्‍यातच भाग्‍यनगरचे एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन औवेसी यांनी उर्दू भाषेत शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’ घोषणा दिल्‍यानंतर ‘जय फिलीस्‍तिन (पॅलेस्‍टाईन) आणि ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशाही घोषणा दिल्‍या. (ओवैसी पॅलेस्‍टाईनमधील त्‍यांच्‍या धर्मबांधवांच्‍या पाठीशी उभे रहातात; मात्र याच पॅलेस्‍टाईनच्‍या ‘हमास’ या आतंकवादी संघटनेविषयी मौन बाळगतात ! – संपादक) या वेळी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ओवैसी यांच्‍या या घोषणांना विरोध केला. त्‍यांनी या घोषणा सभागृहाच्‍या नोंदीमधून काढून टाकण्‍याची मागणी केली.

जी. किशन रेड्डी म्‍हणाले की, एकीकडे ओवैसी राज्‍यघटनेविषयी बोलतात, तर दुसरीकडे राज्‍यघटनेच्‍या विरोधात घोषणाबाजी करतात. भारतात रहात असतांना पॅलेस्‍टाईनचे गोडवे गाणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटना या लोकांचा खरा चेहरा समोर आणतात. असे प्रकार ते प्रतिदिन करतात.

संपादकीय भूमिका 

  • किती हिंदु खासदारांनी ‘हर हर महादेव’ अशा सारख्‍या धार्मिक घोषणा दिल्‍या ? हिंदु खासदार आत्‍मघातकी धर्मनिरपेक्षतेचे काटेकोर पालन करण्‍याचा प्रयत्न करतात, तर मुसलमान खासदार उघडपणे त्‍यांच्‍या धार्मिक घोषणा देऊन ते धर्मनिरपेक्ष नसल्‍याचे दाखवून देतात !
  • धर्मांधांची ही मानसिकता भारताच्‍या फाळणीच्‍याही आधी होती आणि आताही आहे; मात्र गांधीवादी हिंदू अजूनही जागे झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या विनाशाचेच लक्षण आहे !