श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांची उघडपणे स्वीकृती !
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी प्रथमच मान्य केले की, भारताच्या साहाय्यामुळे त्यांचा देश २ वर्षांतील सर्वांत वाईट आर्थिक संकटातून बाहेर पडला आहे. हे सर्व भारताकडून मिळालेल्या २९ सहस्र कोटी २४७ कोटी रुपयांच्या (३५० कोटी डॉलर्सच्या) आर्थिक साहाय्यामुळे शक्य झाले. त्या सर्वांची परतफेडही केली जाईल.
येथे ३१ व्या अखिल भारतीय भागीदारी बैठकीत बोलतांना विक्रमसिंघे म्हणाले की, अक्षय ऊर्जा हा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यावर दोन्ही देश संयुक्तपणे काम करतील. संयुक्त कार्यक्रमाला गती देण्याची आवश्यकता असतांना मी माझ्या मागील भेटीत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनीही ते मान्य केले. आम्ही अनेक प्रस्तावांवर चर्चा केली आहे.
संपादकीय भूमिका
|