American Leaving Religion : अमेरिकेत धर्माचा प्रभाव अल्प होत आहे ! – प्यू रिसर्च सेंटर

वॉशिंग्टन – अमेरिकेतील सार्वजनिक जीवनात धर्माचा प्रभाव सातत्याने अल्प होत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात अनुमाने ८० टक्के अमेरिकी लोक यावर विश्‍वास ठेवतात, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी धर्माचा प्रभाव अल्प होत असल्याचे सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याच वेळी, केवळ ८ टक्के अमेरिकी प्रौढांचा असा विश्‍वास आहे की, धर्माचा प्रभाव वाढत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे.

यापूर्वी म्हणजे वर्ष २०१७ मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये अनुमाने  २३ टक्के अमेरिकी मुसलमानांनी त्यांच्या धर्माशी संबंध तोडल्याचे सांगितले होते; मात्र इतर धर्मांतून इस्लाम स्वीकारणार्‍यांची संख्याही जवळपास २३ टक्के होती. अशा प्रकारे इस्लाम सोडणार्‍यांची आणि त्यात सामील होणार्‍यांची संख्या समान होती. यासह २२ टक्के ख्रिस्तींना त्यांच्या पंथाशी संबंध ठेवायचे नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते.