१. पू. रमानंदअण्णांच्या समवेत प्रत्येक दौर्यावर असतांना ‘अचूक गुरुसेवा करणे आणि गुरुप्राप्ती करून घेणे’, असे ध्येय घेणे
‘पू. रमानंदअण्णांच्या समवेत प्रत्येक दौर्यात मला एक ध्येय प्राप्त झाले. त्याप्रमाणे मी संतांच्या मार्गदर्शनानुसार जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या दौर्याला गेलो. तेव्हा मला ‘अचूक गुरुसेवा करणे आणि गुरुप्राप्ती करून घेणे’, हे ध्येय मिळाले.
२. शिकायला मिळालेली सूत्रे
मी पहिल्यांदाच धर्मसभेमध्ये ५ दिवस पूर्णवेळ सेवेत सहभागी झालो. या ५ दिवसांत मी निरीक्षण करणे, ‘इतरांवर अवलंबून न रहाता स्वतः सेवा करणे’, हा भाव निर्माण होणे, सेवेला भावाची जोड देण्याचा प्रयत्न करणे, सेवाभाव निर्माण होणे आणि समर्पणभाव निर्माण होऊन भावजागृती होणे या गोष्टी शिकलो अन् अनुभवल्या. अशा प्रकारे सेवेच्या माध्यमातून मला प्रगती करण्याची दिशा मिळाली.
३. पू. रमानंदअण्णा यांच्या सहवासात जाणवलेली सूत्रे आणि आलेले अनुभव
अ. पू. रमानंदअण्णांच्या सहवासात मला गुरुदेवांची प्रीती अनुभवायला मिळाली.
आ. पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.
इ. पू. रमानंदअण्णांच्या पहिल्याच प्रत्यक्ष मार्गदर्शनाच्या वेळी मी अंतर्मुख झालो.
ई. त्यांच्या मार्गदर्शनाने ‘केवळ एकाच मासात नियमित सेवेत जोडले जावे’, असे मला वाटले आणि मी माझा खासगी वैद्यकीय व्यवसाय ८ घंट्यांवरून ४ घंटे केला. त्यामुळे मला व्यवसाय करून इतर वेळ प्रसार सेवा करण्याचे भाग्य मिळाले.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासंदर्भात आलेल्या अनुभूती
अ. दौर्यामध्ये एक दिवस मी संतांच्या खोलीत प्रवेश केला आणि अकस्मात् मला गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) ‘पांढरा सदरा आणि पायजमा’ परिधान केलेले विराट रूप दिसले.
आ. प्रत्येक सेवेत कुठे ना कुठेतरी कुणाच्या ना कुणाच्या तरी माध्यमातून गुरुदेवांचे अस्तित्व मला अनुभवायला मिळत होते. मला सूक्ष्मातून सतत गुरुदेवांचे मार्गदर्शनही मिळत होते.
५. मी आश्रमात आल्यानंतर ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांवर लक्ष देणे अन् सूक्ष्म स्तरावर प्रयत्न करणे’, असे ध्येय घेतले.
मला पू. रमानंदअण्णा यांच्या समवेत नियमित दौर्यावर जाण्याची संधी मिळते. त्यांचे मला सतत मार्गदर्शनही मिळत असते. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– डॉ. प्रणव मल्ल्या, मंगळुरू, कर्नाटक. (२८.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |