
‘७.१२.२०२४ या दिवशी ‘स्कंद षष्ठी’ होती. या तिथीला भगवान कार्तिकेयाचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान कार्तिकेयाची पूजा करतात. या शुभ दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील ध्यानमंदिराच्या आगाशीमध्ये एक मोराचे पिल्लू आले होते, तसेच सेवाकेंद्राच्या गाडीवर एक मोठा मोर बसला होता. नंतर तो सेवाकेंद्राच्या मुख्य द्वारासमोरून गेला. अशा प्रकारे या दिवशी सर्वांना मोराचे दर्शन झाले. भगवान कार्तिकेय हा देवतांचा सेनापती आहे आणि त्याचे वाहन मोर आहे.
याच दिवशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका राजस्थानच्या दौर्यावर होते. तेव्हा त्यांनी श्री तनोटमातेचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी श्री तनोटमातेला प्रार्थना केली. त्यांनी आम्हाला भ्रमणभाषवर श्री तनोटमातेचे दर्शनही घडवले. श्री तनोटमातेने युद्धाच्या वेळी भारतीय सैनिकांचे रक्षण केले होते.
अशा प्रकारे आम्हाला भगवान कार्तिकेय आणि सैनिकांचे रक्षण करणारी श्री तनोटमाता यांचे दर्शन एकाच दिवशी झाले. हे सर्व ईश्वराचेच नियोजन असल्याचे आमच्या लक्षात आले. या अनुभूतीसाठी आम्ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या श्री चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– मथुरा सेवाकेंद्रातील सर्व साधक, मथुरा, उत्तरप्रदेश. (१२.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |