पिया तोरी शरण मांगू ।

‘९.१२.२०२४ या दिवशी सकाळी मला जाग आली आणि एकाएकी माझ्या मनात ‘मी एक गोपी आहे, जी कृष्णाला भेटण्याची इच्छा ठेवते, त्याच्यावर प्रेम करते, त्याचे सदैव चिंतन करते. ती कृष्णसखी जिने कृष्णाला मनोमन वरले आहे, ती मी आहे’, असे विचार आले आणि ‘त्याला आळवतांना ती काय म्हणते ?’, ते पुढील शब्दांत स्फुरले.

पिया तेरे चरण मांगू ।
पिया तोरी शरण मांगू ।। १ ।।

श्री. धैवत वाघमारे

मन मोरा तुझे नित चाहे ।
इस हृदय की वाणी नित कहे ।। २ ।।

तू ही मेरे मन की आस है ।

तू ही तू नित मेरे पास है ।। ३ ।।
पिया तुम बिन कहीं न लागे ये मन ।

पिया तुम बिन कुछ न चाहे ये नयन ।। ४ ।।
फिर क्यों संशय मेरे मन में ।
ऐसी क्यों प्यास है ।। ५ ।।

एक तू ही उत्तर ।
एक तू ही जीवन ।। ६ ।।

अब तोड सारे बंधन ।
चलूं केवल तेरे संग ।। ७ ।।

अब ना कभी तेरा हाथ छोडूं ।
अब ना कभी तुझसे दूर रहूं ।। ८ ।।

अब नित तेरे चरण पखारूं (टीप)
अब नित तेरा स्मरण करूं ।। ९ ।।

टीप – नेहमी तुझे चरण धुईन.

मनाच्या अत्यंत दोलायमान स्थितीत देवच माझा हात धरून उभा आहे, तोच चालवतो आहे, त्यानेच मला शांत केले, असे मला वाटले.’

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक