Mughals Undeserved Sublimation : मोगल होते म्हणून देशातील लोकशाही बळकट राहिली !

बिहारमधील सत्ताधारी जनता दल (संयुक्त) पक्षाचे बांधकाममंत्री अशोक चौधरी यांची गरळओक !

मोगलप्रेमी अशोक चौधरी

पाटलीपुत्र (बिहार) – श्रीराममंदिराचे उद्घाटन होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर  बिहारचे बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी मोगलांचे अश्‍लाघ्य उदात्तीकरण केले आहे. चौधरी म्हणाले की, मोगलांनी भारतावर शासन केल्यामुळे भारतातील लोकशाही बळकट राहिली. मोगलांनी त्यांच्या राजवटीत इस्लाम धर्माचा प्रचार केला असला, तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपल्याला लुटले नाही. (‘मोगलांनी हिंदूंना लुटले नाही’, असे म्हणणार्‍या चौधरी महाशयांच्या अतुलनीय शोधासाठी त्यांना पुरस्कारच दिला पाहिजे ! – संपादक)

चौधरी पुढे म्हणाले,

१. मोगलांनी आपल्या देशातून पळ काढला नाही. त्यांचे जे काही होते, ते याच देशात राहिले.

२. आपल्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून ब्रिटिशांनी त्यांचे घर भरले.

३. भाजप श्रीराममंदिराचे ‘मार्केटिंग’ करून धर्माचे राजकारण करत आहे. श्रीराममंदिराचे राजकारण करणे योग्य नाही. केंद्र सरकारने वाढती बेरोजगारी आणि महागाई यांकडे लक्ष दिले पाहीजे. रामाचे नाव घेऊन कोणतीही व्यक्ती उपाशीपोटी कशी काय राहू शकते ? (हिंदूंचा अशा प्रकारे बुद्धीभेद करणारे हिंदुद्वेष्टे मंत्री अशोक चौधरी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मागील साडेपाचशे वर्षांच्या अथक लढ्यानंतर अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जात आहे. चौधरी यांच्यासारख्यांची खरीतर हीच पोटदुखी आहे आणि राजकीय पराभवही ! चौधरी आणि त्यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकारणी नैराश्येतून ही वक्तव्ये करत आहेत !
  • अशा प्रकारचे वक्तव्य ही खरेतर लोकशाहीची थट्टा आहे. एका बहुसंख्य समाजावर गेली शेकडो वर्षे अनन्वित अत्याचार करणाऱ्या, त्यांच्या संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी दिवसरात्र एक करणार्‍या, त्यांच्या महिलांना भ्रष्ट करणार्‍या, लक्षावधी लोकांना ठार मारणार्‍या मोगलांचे उदात्तीकरण हा हिंदूंचा अवमान होय !