‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना साधकाला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

१० ते २५.६.२०२३ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’निमित्त सेवेसाठी गेलो होतो. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव चालू होण्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून आम्ही सेवा चालू केली. सेवा करतांना गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. साधकांप्रती कृतज्ञता वाटणे

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहाण्यासाठी प्रतिष्ठित पाहुणे सतत येत होते. त्या वेळी मार्गिका, प्रसाधनगृह आदी स्वच्छ आहेत ना ते पहाणे आणि काही अव्यवस्थित दिसल्यास ते व्यवस्थित करणे, अशा सेवा माझ्याकडे होत्या. त्या वेळी उत्तरदायी साधक अधूनमधून माझी विचारपूस करत होते. उत्तरदायी साधक ‘‘तुला सेवा जमते ना ? दमायला झाले का ?’, असे मला विचारत असत. मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.

कु. शार्दुल चव्‍हाण

२. शांती अनुभवणे आणि आनंद जाणवणे

सेवा करतांना माझा नामजप आणि गुरुस्मरण सतत होत होते. मला आतून शांत वाटून आनंद होत असे.

३. निर्विचार स्थिती अनुभवता येणे

आश्रमात असतांना मी ७ – ८ दिवस निर्विचार स्थिती अनुभवली. अशी निर्विचार स्थिती मी प्रथमच अनुभवली.

पूर्वी माझ्या मनात अनेक विचार असत. माझ्या मनात येणार्‍या विचारांची तीव्रता एवढी होती की, मी सेवा थांबवून विचार करत असे. केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला या वेळी अशी निर्विचार स्थिती अनुभवता आली.

४. ही सेवा केल्यामुळे ‘साधकांचे कौतुक करणे, इतरांना त्यांच्या स्थितीला जाऊन समजून घेणे, इतरांवर प्रेम करणे, सर्वांशी जवळीक साधणे’ इत्यादी गुण स्वतःत कसे विकसित करायचे ?’, याविषयी माझ्या लक्षात आले.

मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘गुरुदेवांची अशीच कृपा माझ्यावर अखंड रहावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. शार्दुल चव्हाण, कुडाळ, सिंधुदुर्ग. (ऑगस्ट २०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक