‘अंबाजोगाई येथील सौ. पुष्पा स्वामी साधना सत्संगात उपस्थित राहू लागल्यापासून त्यांना पुष्कळ चांगले वाटत आहे. पूर्वी त्यांना त्यांची कुलदेवी ठाऊक नव्हती.

त्यांनी सत्संगात सांगितल्यानुसार ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप चालू केल्यानंतर त्यांच्या परिचयातील एका महिलेने सौ. स्वामी यांना त्यांच्या कुलदेवतेविषयी सांगितले. नंतर सौ. स्वामी कुलदेवतेचे दर्शन घेऊन आल्या. आता त्यांना पुष्कळ आनंद मिळत आहे. त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यांनी त्यांची मुले, सुना आणि नातवंडे यांना नामजपाचे महत्त्व सांगितले. त्यांनी सर्वांना ‘सात्त्विक उत्पादने आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ यांविषयी माहिती सांगितली. त्यांनी घरातील सर्वांना ‘तुम्ही साधना करा’, असे सांगितले. तेव्हा सर्व जण पुष्कळ उत्साही होते आणि जिज्ञासेने सर्व माहिती ऐकत होते.
सौ. पुष्पा यांनी धर्मप्रसारासंबंधी पत्रके वितरण करण्यासाठी घेतली आणि त्यांनी सांगितले, ‘‘मी आजच ही पत्रके वितरण करते.’’
कृतज्ञता गुरुदेव !’
– सौ. स्नेहा भोवर, सोलापूर (२०.१०.२०२४)