बजरंग दलाने पोलीस तक्रार केल्यानंतर मुसलमान युवकांनी क्षमा मागितली
कुडचडे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) : गुड्डेमळ, सावर्डे येथे रजिक शेख आणि अन्य एक मुसलमान युवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना टिपू सुलतानच्या पायाशी दाखवल्याची ‘पोस्ट’ ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमातून प्रसारित केली. विशेष म्हणजे या युवकांनी हिंदूंच्या नावांनी बनावट खाते सिद्ध करून त्यावरून ही आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली. यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर बजरंग दलाने त्वरित याची नोंद घेऊन संबंधित युवकांची ओळख शोधून काढून त्यांच्या विरोधात कुडचडे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. संबंधित युवकांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर त्यांनी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याविषयी सर्वांची क्षमा मागितली आणि लेखी क्षमापत्रही पोलिसांना दिले. तसेच ‘क्षमा मागत आहे आणि यापुढे असे कृत्य करणार नाही’, असे सांगणारे चलचित्र सामाजिक माध्यमात प्रसारित केले. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे हे कृत्य करण्यास सांगणारा सूत्रधार कोण ? हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी जोर धरत आहे.
बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, या २ मुसलमान युवकांनी आकाश नाईक, काजल, राम आदी हिंदु नावांनी ‘इन्स्टाग्राम’वर बनावट खाती सिद्ध केली आणि त्यावरून आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली. हिंदु मुलींच्या नावाचा वापर करूनही ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे. गेले काही मास हिंदु धर्मावर वारंवार आघात होत आहेत. यापूर्वी ख्रिस्ती पाद्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. हिंदु धर्मावर आघात झाल्यास ते रोखण्यासाठी बजरंग दल सदैव तत्पर असते.’’
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिका
|