हिंदु राष्ट्राची स्थापना करून गुरु-शिष्य परंपरेचे कर्तव्य पार पाडूया !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाविषयी आलेला अनुभव

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव हा अद्भुत आणि अविस्मरणीय होता. कार्यक्रमात देश-विदेशातील लढवय्ये हिंदू, तसेच विविध राज्यांच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ते, साधूसंत सहभागी झाले होते. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. कायदा आणि राज्यघटना यांच्यानुसार हिंदु राष्ट्र संकल्पनेचा लढा कसा द्यायचा ? हे महोत्सवात समजले. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील माझा अनुभव म्हणजे ‘मां भारती (भारतमाता) आपली आई असून सर्व राज्यांतील आपण हिंदुत्वनिष्ठ सर्व तिचे संतान आहोत. आपण सर्व जण दीपावली, गणेशोत्सव, दसरा हे सर्व सण साजरे करतो. तसाच अनुभव वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात आला.’

श्री. संदीप खटावकर

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात आलो, त्या वेळी माझ्या मनात पुढील शंका होत्या –

अ. हिंदु राष्ट्र संकल्प कसा करायचा ?

आ. गोहत्येचा संपूर्ण निषेध कसा करायचा ?

इ. लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, हलाल जिहाद यांच्या विरोधात वैध मार्गाने कसे लढायचे ?

ई. कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायद्याला १०० टक्के यश का मिळाले नाही ?

यावर संतांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझे शंकानिरसन झाले. त्यातून मला लक्षात आले, ‘आध्यात्मिक आणि धर्मशिक्षणाचा अभावच या सर्वांना कारणीभूत आहे. प्रत्येक हिंदूचे आध्यात्मिक शुद्धीकरण झाले पाहिजे. अध्यात्माविषयीचे ज्ञान, तसेच धर्मशिक्षण देऊन साधक सिद्ध झाल्यास हिंदु राष्ट्र साकार होणे शक्य आहे. जाती-जातींमध्ये असलेले वैमनस्य आधी नष्ट केले पाहिजे. जात, प्रांत, हे भेद नष्ट करून ‘आपण सर्व एक आहोत’, ‘आपण हिंदु आहोत’, हे बिंबून आपण साधना करून साधक झाल्यास या समस्येवर उपाय सापडतो आणि त्यामुळे कुणीही आपल्यात जातीचे विषारी बीज रुजवू शकत नाही.’ ‘संघटन’ याविषयीही अनेक शंका होत्या, त्याही दूर झाल्या.

मी पुण्यवान आहे; कारण मला २ गुरु आहेत. एक म्हणजे हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई आणि दुसरे गुरु म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! यांच्या मार्गदर्शनाने आपणही हिंदु राष्ट्राची स्थापना करूया अन् गुरु-शिष्य परंपरेचे कर्तव्य पार पाडूया.

– श्री. संदीप खटावकर (गुरुजी), कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु राष्ट्र सेना. (१२.७.२०२३)