भाजप महिला मोर्चाच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी, १३ जून (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची मानहानी आणि अपकीर्ती केली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देते वेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सौ. शिल्पा मराठे, महिला मोर्चा पदाधिकारी कार्यकर्त्या सौ. अंजली साळवी, सौ. वर्षा ढेकणे, सौ. रेशम तोडणकर, सौ. प्रणाली रायकर, सौ. उषा राजपूत, सौ. अपर्णा खरे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे हरण मीच करणार – चित्रा वाघhttps://t.co/aMY4XLTAZO< येथे वाचा सविस्तर वृत्त#ncp #bjp #MaharashtraPolitics #jitendraawhad #chitrawagh @BJP4India @ChitraKWagh pic.twitter.com/DDnf1jOe1P
— LoksattaLive (@LoksattaLive) June 10, 2023
या निवेदनात म्हटले आहे की,
१. आम्ही भाजप महिला मोर्चाच्या प्रतिनिधी समाजात महिला सबलीकरण करण्याचे, तसेच सामाजिक आणि आर्थिक स्तरावर महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहोत. जेथे जेथे महिलांवर अन्याय होतो, तेथे आम्ही आवाज उठवतो; पण सध्या भाजप प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे पहाता एक महिला म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही. आव्हाड यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी.
पुणे,कोंढवा पोलिस स्टेशन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा अध्यक्ष माननीय चित्रा ताई वाघ यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पुणे ग्रामीण भाजपा च्या वतीने निषेध करून कोंढवा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा . pic.twitter.com/32AARzlYr8
— Snehal Ganpat Dagade (@SnehalGanpat) June 12, 2023
२. जितेंद्र आव्हाड यांनी ९ जूनच्या रात्री चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण ट्विटरवर अपलोड केले. चित्रा वाघ यांची मानहानी करण्याचा, त्यांना कलंकित करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार केला आहे.
३. जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत, हे सहन केले जाणार नाही.