विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून गावातील विद्यार्थ्यांचा धर्मांतराचा प्रयत्न !

  • पश्‍चिम सिंहभूम (झारखंड) येथील घटना !

  • मुलांना विनामूल्य वाटली होती येशूविषयी माहिती देणारी पुस्तके !

पश्‍चिम सिंहभूम (झारखंड) – येथे पोलिसांनी धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या एका टोळीचे षड्यंत्र उघड केले आहे. यातील ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यांत ३ महिलांचा समावेश आहे. ही टोळी येथील गावांमध्ये मुलांना विनामूल्य शिक्षण देण्याच्या नावाखाली धर्मांतराचे कार्य करत होती.

१. येथील देवगावामध्ये ३-४ दिवसांपूर्वी ३ महिला आणि १ तरुण यांनी मुलांना विनामूल्य शिक्षण देण्यासाठी शाळा चालू केली होती. त्यांनी प्रथम मुलांना विनामूल्य पुस्तके आणि पेन्सिल यांचे वाटप करून पालकांचा विश्‍वास संपादन केला.

२. शिक्षणाच्या नावाखाली वाटण्यात आलेली पुस्तके ख्रिस्ती धर्माविषयीची होती. यामध्ये येशूचे चित्र, तसेच विचार आणि माहिती होती. मुलांना येशूच्या चित्रांना रंग भरण्यास सांगितले जात होते.

३. काही गावकरी या शाळेमध्ये पोचले असता त्यांनी पुस्तके पाहिल्यावर त्यांना शंका आली. त्यांनी या टोळीला प्रश्‍न विचारण्यास चालू केले. त्यावर त्यांनी मुलांना येशूविषयी माहिती शिकवत असल्याचे मान्य केले.

४. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आल्यावर पोलिसांनी या चौघांना अटक केली. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !