केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड !

चंडीगड (हरियाणा) – ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.

रेवाडी (हरियाणा) येथे मौसम खान याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलीचे केले अपहरण आणि धर्मांतर !

हरियाणाच्या रेवाडीमध्ये मौसम खान याने हिंदु असल्याचे भासवून धारुहेरा येथील एका हिंदु मुलीशी मैत्री केली. त्याने हिंदु मुलीचे अपहरण करून तिला हरिद्वार येथे नेले. तेथे त्याने मुलीवर बलात्कार केला. नंतर मुलीला उटोन गावामध्ये नेऊन तिथे तिचे बळजोरीने इस्लामध्ये धर्मांतरण करत बंदुकीच्या जोरावर तिला स्वतःशी लग्न करण्यास भाग पाडले. पीडित हिंदु मुलीला घरात ओलीस ठेवण्यात आले. या वेळी मौसम खान याच्या लहान भावानेही तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ३ वर्षे अत्याचार सहन केल्यानंतर पीडित मुलगी एक दिवस संधी साधून पळून जाण्यात यशस्वी ठरली. पीडित मुलीने मौसम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे हिंदु मुलीवर धर्मांतरासाठी दबाव !

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये अमन शाह नावाच्या मुसलमान तरुणाने अमन वाल्मिकी असे हिंदु नाव धारण करून हिंदु मुलीशी मैत्री केली. लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला . त्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला. पीडित मुलीने त्याच्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण चालू केली, तसेच तिचा अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आरोपीच्या विरोधात कंपू पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. अमन शाह याला अटक करण्यात आली आहे.

अरमानच्या हिंदु पत्नीवर अरमानच्या मित्रांकडून बलात्कार !

आग्रा, उत्तरप्रदेश येथील एका हिंदु मुलीची तिच्या मुसलमान मैत्रिणीने फिरोजाबाद येथील अरमान नावाच्या मुसलमान तरुणाशी मैत्री घडवून आणली. हा प्रकार हिंदु मुलीच्या आईला समजताच त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र आईवर संतापून मुलगी घरातून निघून गेली. अरमानने त्या हिंदु मुलीशी लग्न केले. काही दिवसांनी अरमानच्या मित्रांनीही तिच्यावर बलात्कार करणे चालू केले. यास विरोध केल्यावर तरुणीला मारहाण करण्यात आली. पीडित मुलीने आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला दुबई नेऊन केले तिचे धर्मांतर !

बिहारमधील मोतिहारी येथील महंमद तालिक याने नोएडा येथे शिकत असतांना उत्तरप्रदेशातील एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर दोघेही दुबईला गेले. तेथे हिंदु मुलीचे धर्मांतर करून त्याने तिच्याशी विवाह केला. दोन वर्षे हिंदु मुलीचा उपभोग घेतल्यानंतर एक दिवस तालिक बेपत्ता झाला. त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलगी उत्तरप्रदेशमध्ये परतली आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.