बिहारमध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांच्या मागावर असणार्‍या चिनी महिला गुप्तहेराचा घेतला जात आहे शोध !

तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (डावीकडे) चिनी महिला गुप्तहेर सांग जियालोनचे रेखाचित्र (उजवीकडे)

गया (बिहार) – तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा बिहारच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍याच्या वेळी चिनी महिला गुप्तहेर त्यांच्या मागावर आहे, अशी माहिती अन्वेषण यंत्रणांना मिळाली आहे. आता या महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

तिच्या वर्णनावरून तिचे रेखाचित्र बनवण्यात आले आहे. त्याद्वारे तिचा शोध घेतला जात आहे. तिचे नाव सांग जियालोन असल्याचे म्हटले जात आहे. तिने भिक्षुकाचा वेश परिधान केला आहे. बोधगया पोलिसांनी ३ मासांपूर्वी एका उपाहारगृहातून एका संशयित चिनी गुप्तहेरालाही कह्यात घेतले होते.