
पारतंत्र्यांमध्ये असतांना ‘स्वातंत्र्यप्राप्ती’ हे भारतियांचे परमोच्च ध्येय होते. देश स्वतंत्र झाल्यावर परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीवर निर्माण केलेली त्यांची विजयाची स्मारके आपण जतन न करता आपल्या थोर परंपरा आणि शूरवीर यांची स्मारके जतन करणे नितांत आवश्यक होते; पण हिंदु समाज गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. परकियांच्या उदात्तीकरणातून भारतियांमध्ये स्वाभिमान निर्माण होऊ देण्यात आला नाही. अशा परिस्थितीत हिंदु समाजाला ‘स्वत्व’ स्वाभिमानाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला; तथापी त्यांच्यावर खोटे-नाटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करण्याचे काम आताच्या क्षणापर्यंत चालू आहे. अशा स्थितीत दैनिक ‘सनातन प्रभात’ने राष्ट्राभिमान जागृत करण्याची मोठी चळवळ उभी केली. हिंदु समाजाला आवश्यक असलेली राष्ट्रीय दृष्टी प्राप्त व्हावी, आपल्या वीर पुरुषांच्या विचारांचा संस्कार उगवत्या पिढीवर व्हावा, या हेतूने सातत्याने कार्य केले, ते दैनिक ‘सनातन प्रभात’ने ! इस्लामी आक्रमकतेला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी सनदशीर मार्गाने विविध आंदोलने करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी हिंदु समाजाला संघटित करण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ने वैचारिक चळवळीद्वारे केले.
सनातन प्रभात हे केवळ वृत्तपत्र नसून राष्ट्राभिमान जागृत करून राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक परंपरा जतन करत राष्ट्रीय शिक्षण देणारे अन् संस्कार करणारे पत्रही आहे. मंदिरे म्हणजे सांस्कृतिक केंद्राचे पावित्र्य राखण्यासाठीही दैनिक प्रयत्नरत आहे.
हिंदु समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख प्रकाशित करून राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय घडामोडी अशा विषयांचा परिचय करून देऊन हिंदु समाजाला बहुश्रुत आणि अद्ययावत् करण्याचा प्रयत्न करणारे ‘सनातन प्रभात’ एखाद्या विद्यापिठाचे कार्य करत आहे.
मानवाचे भौतिक जीवन म्हणजे सामाजिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक अंग आहे. हे लक्षात घेऊन दैनिक त्या दृष्टीने कार्य करणारे हिंदु समाजाला परमार्थिक जीवनासाठी मार्गदर्शन करणारे आणि साधना पटवून देणारे एकमेव वृत्तपत्र भारतात असेल !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त अनेकानेक शुभेच्छा ! राष्ट्रजागृतीचे कार्य ‘सनातन प्रभात’द्वारे अविरत चालू राहील, याविषयी निश्चिती आहे.