गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला !

कोरेगाव भीमा एल्गार परिषद प्रकरण

गौतम नवलखा

मुंबई – कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे. गौतम नवलखा यांना ‘एल्गार परिषद’ प्रकरणी एप्रिल २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. ‘नवलखा यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना औषधोपचारासाठी जामीन संमत करण्यात यावा’, अशी विनंती त्यांच्याकडून न्यायालयाला करण्यात आली होती; मात्र यापूर्वीच न्यायालयाने ही विनंती नाकारली होती.