व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

व्याकरणाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या व्याकरणाच्या प्रकरणातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘भोषेचे सौंदर्य तिच्या व्याकरणात असते. व्याकरण जितके शुद्ध, सोपे आणि सुटसुटीत असेल, तेवढे ते शिकतांना आनंद मिळतो. सनातनच्या साधिका सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे यांची मराठी व्याकरणाशी संबंधित लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रतिसप्ताह प्रसिद्ध करण्यात येते. ही लेखमाला सोपी आणि सुटसुटीत असल्याने ती वाचतांना अन् त्यातून शिकतांना आनंद मिळतो. भाषा शिकतांना तिचे व्याकरण क्लिष्ट असेल, तर मन अन् बुद्धी यांवर ताण पडल्याने ते शिकतांना कंटाळा येतो. याउलट व्याकरण सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, तर मन आणि बुद्धी यांवर ताण न येता ते शिकतांना आनंद मिळतो. व्याकरण सोपे आणि सुटसुटीत असण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

१. सुश्री सुप्रिया नवरंगे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या व्याकरणाच्या प्रकरणातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

मराठी व्याकरणाच्या एका पुस्तकातील ‘विसर्गसंधी’ हे प्रकरण आणि सुश्री सुप्रिया नवरंगे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेले व्याकरणाचे तेच प्रकरण यांच्या प्रती काढून त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


वरील सारणीतून लक्षात येते की, मराठी व्याकरणाच्या एका पुस्तकातील ‘विसर्गसंधी’च्या प्रकरणातून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. याउलट सुप्रिया नवरंगे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या त्याच प्रकरणाच्या प्रतीमध्ये नकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आहेत. याचे कारण पुढे दिले आहे.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

१. मराठी व्याकरणाच्या पुस्तकातील ‘विसर्गसंधी’ या प्रकरणात व्याकरणाचे नियम आणि त्याची उदाहरणे त्रोटक स्वरूपात दिली आहेत. हे प्रकरण वाचतांना विषय तितकासा स्पष्ट होत नसल्याने ते प्रकरण पूर्ण वाचावेसे वाटत नाही. तसेच पूर्ण वाचायचा प्रयत्न केला, तरी त्याचे नीट आकलन होत नाही.

२. सुश्री सुप्रिया नवरंगे यांनी लिहिलेल्या प्रकरणात विसर्गसंधीची व्याख्या, त्याचे प्रकार आणि उदाहरणे इत्यादी सूत्रे सोप्या अन् सुटसुटीत पद्धतीने मांडली आहेत. त्यामुळे हे प्रकरण वाचतांना विषयाचे चांगले आकलन होते, तसेच मनाला आनंद मिळतो. त्यामुळे प्रकरण पूर्ण वाचावेसे वाटते.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

कोणतेही लिखाण करतांना त्याचे व्याकरण आणि संकलन जितके सोपे अन् सुटसुटीत असेल, तेवढी त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलक-साधकांना घडवण्यासाठी पुष्कळ कष्ट घेणे

परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथलेखनाची सेवा करत आहेत. त्यांनी ग्रंथांचे लिखाण करतांना व्याकरण अन् संकलन यांकडे विशेष लक्ष दिले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलक-साधकांना घडवण्यासाठी पुष्कळ कष्ट घेतले आहेत. याची काही सूत्रे पुढे दिली आहेत.

अ. साधकांनी केलेले अध्यात्मविषयक लिखाण पडताळतांना ते समजायला क्लिष्ट असल्यास ते साधकांना त्याची लगेच जाणीव करून देतात. कोणतेही लिखाण करतांना ‘सामान्य वाचकाला समजायला हवे’, अशा प्रकारे त्याची मांडणी करण्याकडे त्यांचे लक्ष असते. यामुळे ‘सनातनचा ग्रंथ असो किंवा सनातनची नियतकालिके असोत, त्यांची भाषा अत्यंत सोपी आणि संकलन अतिशय सुटसुटीत असावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा दृष्टीकोन असतो.

आ. लिखाण करतांना वाक्यरचना लहान आणि सुटसुटीत करणे, सोप्या शब्दांचा वापर करणे, कठीण शब्दांचे अर्थ कंसात देणे, प्रत्येक सूत्रांना क्रमांक घालणे आणि अर्थपूर्ण मथळे देणे, लिखाणाचा मुख्य मथळा लिखाणाला अनुसरून लिहिणे, आवश्यक तेथे सारण्या, आकृत्या यांचा उपयोग करणे, आवश्यक तेथे व्याकरणातील चिन्हांचा उपयोग करणे इत्यादी बारकावे त्यांनी साधकांना शिकवले आहेत.

इ. लिखाण, संकलन आदी सेवा करणार्‍या साधकांना स्वतःकडून होणार्‍या लहान-मोठ्या चुकांचे चिंतन करणे, चुकांसाठी योग्य प्रायश्चित्त घेणे, चुका टाळून सेवा परिपूर्ण करण्यासाठी उपाययोजना करणे आदींची शिकवण परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना दिली आहे. त्यामुळे सेवेतून साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.

‘कोणतीही कृती किंवा सेवा करतांना ती सात्त्विक आणि परिपूर्ण करणे आवश्यक आहे’, याची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.२.२०२२)

ई-मेल : [email protected]

  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक