|
वर्धा – जिल्ह्यात गेल्या ३२ दिवसांपासून एस्.टी कामगारांचा संप चालू आहे. या संपात १ सहस्र ४३० कर्मचार्यांचा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून संपात फूट पडली आहे. आर्वी आगारातील ८ कर्मचारी कामावर आले. यामुळे ४ एस्.टी. आगाराबाहेर पडल्या; मात्र तळेगाव बसस्थानकासमोर आणि तळेगाव आष्टी मार्गावर अज्ञाताने ‘एस्.टी.’वर दगडफेक केल्याने ‘एस्.टी.’ची समोरील आणि मागील काच फुटली. यामध्ये ‘एस्.टी.’चे चालक अविनाश पवार किरकोळ घायाळ झाले आहेत. या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात २ तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हे नोंद केले आहेत.