विजयादशमीनिमित्त शौर्यजागरणाचा संकल्प करूया !

 

महिषासुरमर्दिनी ही क्षात्रतेजाचे प्रगट रूप आहे, हे लक्षात घेऊन नवरात्रोत्सव आणि विजयादशमी यांच्या निमित्ताने स्वतःमधील क्षात्रतेज जागृत करणे म्हणजेच शौर्यजागरण करणे होय ! तीच आजच्या काळाची आवश्यकता आहे. सध्या आयाबहिणींवर होणारे अत्याचार लक्षात घेऊन सर्व हिंदू भगिनींनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. आहे. स्वरक्षण आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण यांसाठी, तसेच मनुष्यातील शारीरिक आणि मानसिक दुर्बलता नष्ट करून त्याच्यातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत करणे आवश्यक आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर शौर्यजागरणाचा संकल्प करूया !