भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

इस्रो चा इओएस्-३ उपग्रह प्रक्षेपणापूर्वी

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (‘इस्रो’च्या)  ‘अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट’ (पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह) ‘इओएस्-३’चे प्रक्षेपण अयशस्वी ठरले आहे. या उपग्रहाने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून १२ ऑगस्टच्या पहाटे ५.४३ वाजता झेप घेतली; परंतु निश्‍चित अवधीच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी तिसर्‍या टप्प्यामध्ये ‘क्रायोजेनिक इंजिन’मध्ये बिघाड झाला. त्यामुळे उपग्रह निर्धारित कक्षेत स्थापित होऊ शकला नाही. तांत्रिक बिघाडांमुळे उपग्रहाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. यानंतर ‘इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी प्रक्षेपण अयशस्वी ठरल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.