क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न
हिंदू संघटित झाले, तर ते बरेच काही साध्य करू शकत असल्याने आता त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केला पाहिजे !
कडप्पा (आंध्रप्रदेश) – जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता. याविषयी स्थानिक वृत्तपत्रांमधून वृत्त प्रकाशित होताच आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांतील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यास तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर हिंदु धर्माभिमान्यांनी २२ जून या दिवशी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार नोंदवली.
१. १५ हून अधिक संघटनांची प्रमुख संघटना असलेल्या ‘हिंदू ऐेक्य संघाल पोराट वैदिका’ (हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटनाद्वारे संघर्ष करण्याचे व्यासपीठ) या संघटनेनेही टीपू सुलतानच्या पुतळ्याला विरोध दर्शवला. यासंदर्भात सामाजिक माध्यमे, तसेच ‘यू ट्यूब’च्या माध्यमांतून जागृती करण्यात आली.
२. एका धर्माभिमानी अधिवक्त्याने स्वयंस्फूर्तीने माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारावर त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांना पत्र लिहिले.
३. विविध स्तरावरील संघटित विरोधामुळे टिपू सुलतानचा पुतळा उभा करण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यात हिंदुत्वनिष्ठांना यश मिळाले.