औषधी वनस्पतींची संख्या अगणित आहे. अशा वेळी कोणत्या वनस्पती लावाव्यात ? असा प्रश्न पडू शकतो. प्रस्तुत लेखात काही महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची घरगुती स्तरावर लागवड कशी करावी ? याविषयी माहिती दिली आहे. वाचक या लेखात दिलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त अन्यही वनस्पती लावू शकतात. आतापर्यंतच्या लेखात आपण तुळस, अडुळसा, माका, पुनर्नवा, ब्राह्मी, शतावरी, हळद, कडूनिंब, पारिजातक आणि वाळा आदी औषधी वनस्पतींची माहिती वाचली. आज अंतिम भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/487492.html |
मार्गदर्शक : डॉ. दिगंबर मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तथा
प्रमुख संचालक, क्षेत्रीय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार.
संकलक : श्री. माधव रामचंद्र पराडकर आणि वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२५. आस्कंद (अश्वगंधा)
२५ अ. महत्त्व : ही वांग्याच्या जातीची वनस्पती आहे. हिची मुळे शक्तीवर्धक आहेत. हे जास्त वापरले जाणारे औषध आहे.
२५ आ. लागवड : हे ६ मासांचे पीक आहे. पावसाळ्यानंतर भातकापणी झाली की, भातशेतीमध्ये अश्वगंधेचे पीक घेता येते. हे दवावर होते. त्यामुळे वेगळ्या पाण्याची आवश्यकता रहात नाही. बियाण्यापासून याची लागवड करतात. मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्तरावर लागवड करायची असल्यास ‘नागोरी’ जातीच्या अश्वगंधेचे बी वापरावे. या जातीच्या झाडांची मुळे अंगठ्याएवढी मोठी असतात. घरगुती स्तरावर लागवड करायची असल्यास न्यूनतम २ ते ४ रोपे लावावीत. घराभोवती जागा असल्यास ५० ते १०० रोपे लावली, तरी त्यांचा उपयोग होतो. फळे धरल्यावर त्यांचा रंग तांबडा होतो आणि पाने गळू लागतात. तेव्हा मुळे खणून काढावीत. मुळे धुऊन वाळवून त्यांची पूड करून ठेवावी. फळांमधून मिळणार्या बियांपासून या वनस्पतीची पुनर्लागवड करता येते. वनस्पतीचा वरचा भाग गुरांचे खाद्य म्हणून वापरता येतो.
२६. उपलसरी (सारिवा किंवा अनंतमूळ)
२६ अ. महत्त्व : रक्तशुद्धी करणारे हे एक श्रेष्ठ औषध आहे. हिची मुळे औषधात वापरतात. ही मुळे अतिशय सुगंधी असतात. याच्या नित्य सेवनाने गर्भाशयातील गाठी विरघळण्यास साहाय्य होते. ही वनस्पती कोकणात पुष्कळ आढळते; परंतु आता ही नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे. शक्य तेवढी जास्त प्रमाणात ही वनस्पती लावावी.
२६ आ. लागवड : या वनस्पतीची पाने खुडल्यावर पांढर्या रंगाचा चीक येतो. कोकणीत या वनस्पतीला ‘दूधशिरी’ म्हणतात. पाने निमुळती हिरवी असतात. त्यांवर पांढर्या रंगाच्या आडव्या-उभ्या रेषा असतात. हिची मुळे खोल असतात. मुळे खणून मिळणारी रोपे घरी आणून लावावीत. जिथे कुठे ही रोपे मिळतील तिथून ती खणून आणून लावावीत. हिच्या खोडाच्या किंवा मुळाच्या तुकड्यांपासूनही लागवड करता येते. २ वर्षांनंतर हिची मुळे औषधांमध्ये वापरण्यासारखी होतात.’
(समाप्त)
|
मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची रोपे किंवा बियाणे मिळण्याची ठिकाणे१. क्षेत्रिय सहसुविधा केंद्र, पश्चिम विभाग, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, भारत सरकार, द्वारा वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. संपर्क क्रमांक : ९०२१०८६१२५ या केंद्राद्वारे शेतकर्यांना लागवडीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाते. डॉ. दिगंबर नभु मोकाट, साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे या केंद्राचे प्रमुख संचालक आहेत. ते शेतकर्यांनी औषधी वनस्पतींची लागवड करावी, यासाठी गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्य करत आहेत. २. औषधी आणि सुगंधी वनस्पती संशोधन संचालनालय, बोरीयावी, गुजरात. (०२६९२-२७१६०२) या ठिकाणी या लेखात दिलेल्या वनस्पतींपैकी तुळस, कालमेघ, शतावरी आणि अश्वगंधा या वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड करायची असल्यास त्यांचे बियाणे मिळते. कोरफड, मंडूकपर्णी (ब्राह्मी), गवती चहा, अडुळसा आणि गुळवेल यांची रोपेही येथे मोठ्या प्रमाणात विकत मिळतात. इच्छुक वाचक येथे संपर्क करून कुरियरद्वारे बियाणे उपलब्ध होऊ शकेल का ? याची विचारणा करू शकतात. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या लागवडीची रोपे किंवा बियाणे यांविषयीची माहिती पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे. https://dmapr.icar.gov.in/HeadPage/Pricelist.html ३. मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती पाहिजे असल्यास त्या पुढील ठिकाणीही मिळू शकतात. त्या त्या संस्थेच्या नावापुढे कंसात संपर्क क्रमांक दिला आहे. ३ अ. महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे आणि त्यांतील उपविभाग १. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (०२३५८-२८२०६४) २. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (०७२४-२२५८३७२) ३. सुगंधी व औषधी वनस्पती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (०२४५२- २३४९४०८) ४. अखिल भारतीय औषधी सुगंधी वनस्पती व पानवेल संशोधन योजना, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणूजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. (०२४२६-२४३३१५, २४३२९२) ३ आ. महाराष्ट्रातील काही खासगी रोपवाटिका (नर्सरी) १. कोपरकर नर्सरी, गवे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. (०२३५८-२८२१६५/२६७५२१, ९४२२४३१२५८) २. इको फ्रेंडली नर्सरी, परंदवाडी, सोमटणे फाट्याजवळ, तालुका मावळ, जि. पुणे. (९४२२२२४३८४, ९२२५१०४३८४) ३. ए.डी.एस्. नर्सरी, कशेळे, कर्जत-मुरबाड रस्ता, जि. रायगड. ४. धन्वन्तरि उद्यान, पिंपळगाव उज्जैनी, जि. नगर. (९६७३७६९६७६) औषधी वनस्पतींची रोपे मिळण्याचे गोव्यातील ठिकाण गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाद्वारे औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते. या विभागाच्या वालकिणी, सांगे आणि घोटमोड, उसगांव, फोंडा आदी ठिकाणी रोपवाटिका आहेत. यांपैकी वालकिणी गावातील रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध लहान औषधी वनस्पतींची रोपे अल्प दरात मिळतात. देवस्थान कमिटी, समाजसेवी संस्था आदींना गोव्यातील वनखात्याच्या ‘वनमहोत्सव’ या उपक्रमाच्या अंतर्गत औषधी वनस्पतींचे विनामूल्य वितरणही केले जाते. गोव्यातील इच्छुक व्यक्ती औषधी वनस्पतींच्या रोपांसाठी गोव्यातील वनखात्याच्या ‘रिसर्च अँड युटिलायझेशन’ या विभागाला संपर्क करू शकतात. संपर्कासाठी पत्ता Dy. Conservator of Forests, Research and Utilisation Division and CEO – State Medicinal Plants Board – Goa. |