लडाख सीमेवर भारतच मागे जात असून चीन पुढे सरकत आहे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा दावा

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – मला समजले की, लडाख येथे ज्या ठिकाणी संघर्ष झाला, तेथून केवळ भारतीय सैन्य मागे हटले आहे; मात्र चीनचे सैन्य तेथेच असून ते पुढे आले आहे, असा दावा भाजप खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करत केला आहे.

डॉ. स्वामी यांना ‘मेन्शन’ (उद्देशून) करत एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे, ‘लडाखमधील संघर्षाच्या एक वर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष न्यून व्हायला हवा होता.’ तसेच या वापरकर्त्याने एक अहवाल सादर केला असून यामध्ये भारत आणि चीन यांच्यातील स्थिती अजूनही तणावग्रस्त असल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. स्वामी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, ‘खरंच का ? परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे सर्व सैनिक परत गेल्याचे घोषित केले होते. आता मला समजत आहे की, केवळ भारत माघारी आला असून चीन आणखी पुढे सरकत आहे.’