शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे आजपासून जिल्हा रुग्णालयात लसीकरण

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे ११ जूनपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा आणि लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात १० जूनला झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सामंत यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कायर्र्कारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता, जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, पारपत्र, व्हिसा, संबंधित विद्यापिठाकडून प्राप्त झालेले १-२० किंवा डी.एस्. ६० अर्ज, विदेशात उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याचे प्रमाणपत्र अथवा नियुक्तीपत्र यांची माहिती संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांना पाठवायची आहे. विद्यार्थ्यांनीही याविषयी संबंधित तालुका आरोग्य अधिकार्‍यांकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.