कुंभमेळ्याची अपकीर्ती करणारे लोक बंगाल येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराविषयी शांत का ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

हरिद्वार कुंभमेळ्याला कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरवून काँग्रेसने घृणास्पद राजकारण केले आहे. यावरून काँग्रेस पक्षाची हीनता दिसून येते. अशा प्रकारे हिंदु धर्माविषयी अपप्रचार काँग्रेसने प्रथमच केला आहे, असे नाही, तर यापूर्वीही काँग्रेसने असे प्रयत्न केलेले आहेत. अचानकपणे हिंदूंच्या कुंभमेळ्याची अपकीर्ती कशी चालू झाली ? तसेच अभिनेत्यांनी कुंभमेळ्याची अपकीर्ती करणे कसे चालू केले ? हेच अभिनेते आणि काँग्रेसवाले मरकजविषयी तबलिगी किंवा बंगाल येथे हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात काही बोलत नाहीत, हेही सर्वसामान्य हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.