|
संत-महात्म्यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू असून समाजाला आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या जगभर नैसर्गिक आपत्तींबरोबर ‘कोरोना’महामारीने थैमान घातले आहे. या भीषण काळात समाजासह साधकांनाही खडतर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तीव्र त्रास होत असतांना अतिशय दु:खदायक प्रसंगात मनाने स्थिर राहून साधनारत रहाणे, हे मोठे आव्हानच असते. खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत; तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृतीही करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !
ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्र
ग्रंथाचे मनोगत
‘अंबरनाथ, जि. ठाणे येथील श्री. देवदत्त कुलकर्णी, त्यांच्या पत्नी सौ. सुजाता आणि त्यांची कन्या कु. तृप्ती असे सर्व कुलकर्णी कुटुंबीय गेली अनेक वर्षे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. गेली १० वर्षे ते घरदार सोडून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहिले. त्यामुळे त्यांचा नातेवाइकांशी विशेष संबंध उरला नाही. अशा स्थितीत सौ. सुजाता कुलकर्णी एप्रिल २०१९ पासून गंभीर आजाराने पीडित होत्या. या आजारातच २०.४.२०२० या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. तशातच २२.३.२०२० पासून ‘कोरोना’ महामारीमुळे देशभरात दळणवळण बंदी होती. एकूणच कुलकर्णी कुटुंबियांसाठी हा आपत्काळच ठरला. ‘सौ. कुलकर्णी यांच्या शेवटच्या गंभीर आजाराला कुलकर्णी कुटुंबियांनी आणि नंतर सौ. कुलकर्णी यांच्या मृत्यूला श्री. कुलकर्णी अन् त्यांच्या एकुलत्या एक मुलीने आश्रमातील साधकांच्या आणि साधनेच्या साहाय्याने धैर्याने तोंड कसे दिले ?’, याची माहिती या ग्रंथात दिली आहे. कुटुंबीय साधक असले की, शेवटचे गंभीर आजारपण अन् मृत्यू यांसारख्या कठीण प्रसंगांना खंबीरपणे तोंड कसे देता येते, याचे आदर्श उदाहरण या निमित्ताने पहायला मिळते. (प्रस्तुत ग्रंथमालिकेतील ‘सौ. सुजाता कुलकर्णी यांचे साधनापूर्व खडतर जीवन आणि साधनाप्रवास’ अन् ‘सौ. सुजाता कुलकर्णी यांचे मृत्यूनंतरचे विधी’ हे अन्य २ ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.)
वर्ष २०२१ पासून सर्वांनाच भीषण आपत्काळाला तोंड द्यावे लागणार आहे. त्या वेळी नैसर्गिक आपत्ती, महायुद्ध इत्यादींमुळे मोठ्या प्रमाणावर नरसंहार होऊ शकतो. अशा वेळी ‘जवळच्या व्यक्तींचा मृत्यू कसा सहन करायचा ? साधना केल्यास मृत्यूसारख्या कठीण प्रसंगी देव कसे साहाय्य करतो ?’, हे या ग्रंथातून शिकायला मिळेल. परीक्षा असली की, आपण त्या विषयाचा अभ्यास करतो. तसे आता येणारा तिसर्या महायुद्धाचा भीषण काळ, ही सर्वांसाठीच मोठी परीक्षा आहे. या परीक्षेच्या सिद्धतेसाठी हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.
‘या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वांनाच आपत्काळाला तोंड देण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता यावे’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’ – संकलक
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी संपर्क : ९३२२३ १५३१७ |