आडाळी (तालुका दोडामार्ग) येथे आयुर्वेद संशोधन केंद्राला मान्यता

१०० कोटी रुपये गुंतवणूक, तर ५० एकर भूमी

सिंधुदुर्ग – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे प्रस्तावित असलेल्या आयुर्वेद संशोधन केंद्राला मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १०० कोटी रुपये गुंतवणूक असलेला हा प्रकल्प ५० एकर भूमीत उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

या केंद्राला मान्यता मिळाल्यानंतर भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.