पू. माईणकरआजींचे अंत्यदर्शन घेत असतांना जाणवलेली सूत्रे

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. भूषण कुलकर्णी

१. पू. आजींचे अंत्यदर्शन घेत असतांना त्या सजीव जाणवत होत्या, तसेच त्यांचा श्‍वास चालू असल्याचे जाणवले.

२. पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहून माझी भावजागृती झाली. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प्रभु श्रीराम यांच्या अनुसंधानात असल्याचे जाणवले. त्यांचे चरण चैतन्यामुळे पिवळे झाल्याचे दिसत होते.

३. पू. आजींचे दर्शन घेत असतांना दुपारी ३.४० वाजता चांगले ऊन असतांना वारा चांगला येत होता आणि त्या वेळी वातावरण आल्हाददायक जाणवत होते.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक