सांगली, १२ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन आणि ‘व्हेंटिलेटर’ची कमतरता लक्षात घेता भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या २६ लाख ५० सहस्र रुपयांच्या स्थानिक विकासनिधीतून ५ ‘व्हेंटिलेटर’ खरेदी करण्यात आले. हे ५ ‘व्हेंटिलेटर’ जिल्ह्याला प्राप्त झाले असून ते आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शासकीय कोरोना केंद्र आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलेश इरळी, डॉ. राम लाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, समुपदेशक अविनाश शिंदे गणपती साळुंखे यांसह अन्य उपस्थित होते.