शरीरसौष्ठवपटू जगदिश लाड यांचे कोरोनामुळे निधन !

शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड

बडोदा – शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड (वय ३४ वर्षे) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. जगदिश लाड हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे आहेत. काही काळ मुंबईत व्यथित केल्यावर लाड हे बडोदा येथे स्थायिक झाले. तेथे त्यांची स्वत:ची व्यायामशाळा होती. लाड यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व लाड यांनी केले होते.