महिलांवरील अत्याचाराने सीमा पार केली आहे. महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर असल्याने त्याचे शिक्षण शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवायला हवे. नुसता अभ्यासक्रमात समावेश करून जागृती होणार नाही. त्यासाठी ठोस उपाययोजना काढायला हवी.
पुणे – महिलांविषयी समाजामध्ये असलेले रूढीवादी विचार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने महिला सुरक्षा आणि लिंग समानता जागृती या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची सूचना देशातील विद्यापिठे आणि महाविद्यालये यांना केली आहे. संसदेच्या स्थायी समितीने ‘ॲट्रॉसिटी क्राईम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रेन’ या विषयावर अहवाल सादर केला होता. या संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून महिलांचे हक्क, समाजातील त्यांची सुरक्षितता याविषयी तरुणांमध्ये जागृती करण्यासाठी हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याविषयी सुचवले होते.