कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील देवस्थाने, मंदिरे यांच्याकडून सढळ हाताने साहाय्य !

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हिंदूंची देवस्थाने, मंदिरे यांनी सढळ हाताने साहाय्य केले होते आणि आता दुसर्‍या लाटेतही साहाय्य करत आहेत ! अशा वेळी मशिदी, चर्च यांच्याकडून काय साहाय्य होत आहे ? यातून ख्रिस्ती करत असलेले साहाय्य हे केवळ धर्मांतरासाठीच आहे, असा विचार कुणाच्या मनात आला तर चूक ते काय ?


कोल्हापूर – कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे हिंदूंची देवस्थाने, मंदिर यांनी सढळ साहाय्य केले त्याचप्रकारे आता दुसर्‍या लाटेतही साहाय्य करत आहेत. राज्यातील आरोग्ययंत्रणांवर ताण यामुळे अल्प होत असून रुग्णांना मोठ्या प्रमाणात साहाय्य होत आहे. नेहमीच देवस्थानांच्या नावाने गळा काढणारे पुरो(अधो)गामी यांच्यासाठी ही एक चपराकच आहे. याचसमवेत हिंदूंची मंदिरे इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतांना मशिदी आणि चर्च कुठे आहेत ? असाही प्रश्‍न सामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

१. श्री गजानन महाराज देवस्थान यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी ५०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारले आहे. यात रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याची सोय आहे आणि त्यात रुग्णांना भोजनही दिले जाते. यामध्ये एका पैशाचाही आर्थिक भुर्दंड रुग्णावर नसतो, सगळा व्यय देवस्थान करत आहे. प्रतिदिन गोरगरीब मजुरांसाठी देवस्थानाने कम्युनिटी किचन संकल्पना चालू केली असून त्याअंतर्गत २ सहस्र जणांना प्रतिदिन अन्नदान केले जाते.

२. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भक्त निवास येथील कोरोना केंद्रामध्ये २०० ऑक्सिजन बेड सेंटर कार्यान्वित करण्यात येत आहेत. या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे ऑक्सिजन बेड सेंटर जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.

३. शिर्डी संस्थानने ऑक्सिजन आणि आर्.टी.पी.सी.आर्. टेस्ट लॅब उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी यांनी पुढाकार घेतला असून संस्थान येत्या १० दिवसांत याची उभारणी करणार आहे. सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा दूर करण्यासाठी संस्थान केंद्रशासनाशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत त्याचा पुरवठा करणार आहेत.

४. कोल्हापुरातील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने १ ल्या लाटेपासून साहाय्य केले आहे. मुख्यमंत्री निधीला दीड कोटी रुपयांचे साहाय्य केले. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १ कोटी रुपये, तर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. या व्यतिरिक्त रिक्षाचालक, घरेलू कामगार, नाभिक समाज, फेरीवाले अशा गरीब घटकांना २ मासांचे रेशन विनामूल्य पुरवले, तर जोतिबा देवस्थानने ४०० गरीब कुटुंबांना २ मासांचे धान्य विनामूल्य पुरवले आहे.