सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे केवळ ४ दिवसांत ५ कर्मचार्‍यांचा मृत्यू !

५ कर्मचार्‍यांचा मृत्यू

सोलापूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ ४ दिवसात विविध विभागात काम करणार्‍या ५ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णांतील काही जणांचे वय हे केवळ ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न-धान्य वितरण विभागात काम करणारे अव्वल कारकून बापूय्या स्वामी (वय ४५ वर्षे), कृषी विभागात आंधळगाव मंडळातील मारापूर मुख्यालयाचे कृषी साहाय्यक असलेले प्रशांत कोळी (वय ३७ वर्षे), निवडणूक शाखेत शिपाई पदावर काम करणारे अण्णासाहेब साबळे (वय ३५ वर्षे), जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक असलेले राजेंद्र वेदपाठक (वय ५४ वर्षे), तर उत्तर सोलापुरातील कवठे गावात कोतवाल असलेले उद्धव राजपूत यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.