कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्राम आणि प्रभाग (वॉर्ड) नियंत्रण समिती कार्यान्वित

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हाधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी, तसेच कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्राम नियंत्रण समितीकरिता गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तसेच शहरी भागात प्रभाग (वॉर्ड) नियंत्रण समितीकरिता मुख्याधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

ग्राम नियंत्रण समिती आणि वॉर्ड नियंत्रण समिती यांनी जिल्ह्याच्या बाहेरून येणार्‍या प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी आणि आरोग्य चाचणी यांविषयी आरोग्य विभागाच्या समन्वयाने कामकाज करावे. गृहअलगीकरणात असलेले नागरिक नियमांचे पालन करत आहेत कि नाही, यावर लक्ष ठेवावे. ज्या लोकांना कोरोनाविषयक लक्षणे दिसून येतात, त्या नागरिकांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करून घ्यावी. गाव किंवा वॉर्ड येथे प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्याच्या प्रभावी कार्यवाहीकरता ग्राम नियंत्रण समिती आणि वॉर्ड नियंत्रण समिती यांनी महसूल, पोलीस, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वयाने काम करावे. रुग्णांच्या संपर्कातील सर्व नागरिकांची आरोग्य विभागाच्या समन्वयाने आर्.टी.पी.सी.आर्. तपासणी करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले आहे.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

२४ घंट्यांतील नवीन रुग्ण १३१ , उपचार चालू असलेले रुग्ण१ सहस्र ९७७ , बरे झालेले एकूण रुग्ण ७ सहस्र ५३, आतापर्यंतचे एकूण रुग्ण ९सहस्र २४१ , चिंताजनक प्रकृती असलेले ८७ मृत्यू झालेले एकूण रुग्ण २०५