शिवजयंतीनिमित्त भालेर (नंदुरबार) येथे व्याख्यान !

नंदुरबार – राष्ट्रनिष्ठ, चारित्र्यवान आणि तेजस्वी पिढी जर या भारताला हवी असेल, तर देशात मोगलांचा इतिहास शिकवून चालणार नाही. शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे चालू केलेल्या आंदोलनाची नोंद घेत शासनाने त्वरित कबर उखडून टाकायला हवी, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भालेर, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे डॉ. सतीश बागुल यांनी केले. व्याख्यानाचे नियोजन भालेर येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी सर्वश्री पवन पाटील, वैभव पाटील, हेमंत पाटील, भावनेश पाटील, निलेश पाटील, प्रमोद पाटील, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, धीरज बोरसे, बादल पाटील यांनी केले होते.