राजदंडापेक्षा धर्मदंड श्रेष्ठ असण्यामागील कारण

प.पू. स्वामी वरदानंद भारती

पाप-पुण्य, सामाजिक कर्तव्य, मानव्य इत्यादी शासनाच्या कक्षेत नसलेल्या आणि धर्माच्या व्यापक कल्पनेच्या आत समाविष्ट होणार्‍या गोष्टी खरोखरीच श्रेष्ठ आहेत, असे मनःपूर्वक वाटले, तरच व्यक्ती संधी असूनही चोरी करणार नाही. प्रामाणिक कर्तव्यदक्षता जितकी धर्माच्या प्रेरणेने निर्माण होईल, तेवढी शासनाच्या भयाने निर्माण होऊ शकणार नाही. यासाठीच राजदंडापेक्षा धर्मदंड श्रेष्ठ आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ‘वाटा आपल्या हिताच्या’ या ग्रंथातून)