सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दू भाषांतर करून सरकारी संस्थेकडून प्रकाशन

मुसलमान लेखक आणि कवी यांची टीका

नवी देहली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ‘भविष्य का भारत’ या पुस्तकाचे उर्दूमध्ये ‘मुस्तकबिल का भारत’ या नावाने भाषांतर करणारे ‘नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज’चे संचालक शेख अकील अहमद यांच्यावर मुसलमानांकडून टीका होऊ लागली आहे. ‘मुसलमानांमध्ये संघाला प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे का ?’ असा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. हे पुस्तक सरकारी संस्था एन्.सी.पी.यू.ए.ने प्रकाशित केले आहे.


१. याविषयी उर्दू कवी आणि दिल्ली उर्दू अ‍ॅकेडमीचे माजी उपसंचालक माजिद देवबंदी यांनी म्हटले की, हा एन्.सी.पी.यू.ए.च्या पैशांचा दुरुपयोग आहे. या पैशांचा वापर केवळ लेखक आणि कवी यांना साहाय्य करून उर्दूला प्रोत्साहन देणे आहे. एका संस्थेच्या विचारसरणीला प्रोत्साहन देणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन नियम आणि धोरण यांच्या विरोधात आहे.

२. यावर शेख अकील अहमद म्हणाले की, यापूर्वी एन्.सी.पी.यू.ए.ने श्रीमद्भगवदगीता आणि गुरु ग्रंथसाहिब यांचे उर्दूमध्ये भाषांतर करून ते प्रसिद्ध केले आहे. सरसंघचालकांचे हे पुस्तक भारताविषयी सांगत आहे. जर हे पुस्तक एन्.सी.पी.यू.ए. उर्दू वाचकांपर्यंत पोचवत असेल, तर त्यात काहीच चुकीचे नाही.