Danish Kaneria On Pahalgam Attack : आतंकवाद्यांना प्रोत्साहन देतांना पाकिस्तानला लाज वाटली पाहिजे !

पहलगाम येथील आक्रमणावर पाकिस्तानचा माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांचा पाकला घरचा अहेर !

पाकिस्तानचा माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानातील माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘जर खरेच पाकिस्तानचा पहलगाम आतंकवादी आक्रमणात हात नाही, तर मग शाहबाज शरीफ यांनी निषेध का केला नाही ? सैन्याला अचानक का सतर्क रहायला सांगितले ? असे त्यांनी यासाठी केले; कारण त्यांना सत्याची कल्पना आहे. वास्तव काय आहे ?, हे त्यांना ठाऊक आहे. आतंकवाद्यांना शरण देतांना आणि आतंकवादाला प्रोत्साहन देतांना पाकल लाज वाटली पाहिजे, असे दानिश कानेरिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना म्हटले आहे.