Fatwa Against Pahalgam Terrorist : कोणत्याही मृत आतंकवाद्याला कब्रस्तानात जागा मिळणार नाही आणि कोणताही इमाम त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही !

‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चा राष्ट्रप्रेमी फतवा

ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी

नवी देहली – जर देशात कोणताही आतंकवादी मारला गेला, तर कोणताही इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) किंवा काझी (इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश) त्याच्या अंत्यसंस्काराचे नेतृत्व करणार नाही. त्याला देशातील कब्रस्तानातही जागा दिली जाणार नाही, असा फतवा ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी काढला आहे.

देशातील साडेपाच लाख मशिदींमधून मृतांना श्रद्धांजली वाहणार !

डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनी पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा  निषेध केला. इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी इमाम हाऊस येथे मृतांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, आतंकवादाला कोणताही धर्म नसतो. धर्म किंवा जात काहीही असो, तो केवळ एक आतंकवादी आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर ज्या पद्धतीने प्रगती करत आहे, ते शेजारी देश आणि आतंकवादी संघटना यांना सहन होत नाही. देशभरातील साडेपाच लाख मशिदींमध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • या फतव्यासाठी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे अभिनंदन ! असा फतवा काढण्यासाठी ३५ वर्षे लागली, हेही विसरता येणार नाही !
  • या फतव्याचे देशभरात पालन केले जाणार आहे ना ?, याकडे या संघटनेने लक्ष दिले पाहिजे. तसेच कोणत्याही मशिदीतून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण केले जाणार नाही, यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत !