कलमा न म्हटल्याने आतंकवाद्यांनी ख्रिस्त्यालाही ठार मारले !

ठार झालेल्या ख्रिस्ती व्यक्तीच्या भावाने रॉबर्ट वाड्रा यांना सुनावले !

(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

सुशील नथानिएल

नवी देहली – आक्रमण झाले, तेव्हा माझी वहिनी माझ्या भावासमवेत (सुशील नथानिएल) होती आणि त्यांनी (आतंकवाद्यांनी) माझ्या भावाला गुडघे टेकून ‘कलमा’ म्हणण्यास सांगितले आणि त्याच्या धर्माविषयी विचारले. जेव्हा भावाने तो ख्रिस्ती असल्याचे सांगितले, तेव्हा आतंकवाद्यांनी त्याला जागीच ठार मारले. आम्ही रॉबर्ट वाड्रा यांच्या विधानाशी सहमत नाही. सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. सरकारला स्वतःला माहिती नव्हते की, असे आतंकवादी आक्रमण होईल, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील इंदूर येथे आतंकवाद्यांनी गोळ्या घालन मारलेले सुशील नथानिएल यांचे भाऊ विकास नथानिएल यांनी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्या विधानावर व्यक्त केली. सुशील यांना आतंकवाद्यांनी ठार मारले. ‘सरकार हिंदु आणि मुसलमान यांच्यात फूट पाडत असल्याने आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले’, असे विधान वाड्रा यांनी केले होते.

संपादकीय भूमिका 

रॉबर्ट वाड्रा या घटनेवर तोंड उघडतील का ? कि तेही कलमा म्हणत असतात ?