राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १३.१२.२०२०

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

मंदिरात साधना शिकवली, तरी रुग्णालयांची आवश्यकता अल्प होईल !

‘सावंतवाडी येथील ‘श्रीराम वाचन मंदिरा’च्या वतीने निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी ‘मंदिरे हवीत कि रुग्णालये ?’, ‘कोरोनानंतरचा भारत कसा असेल ?’, ‘दळणवळण बंदीतील (लॉकडाऊनमधील) माझे अनुभव’, ‘सार्वजनिक स्वच्छता, काळाची गरज’, आदी विषयांवर साधारण २ सहस्र शब्दांपर्यंत मर्यादित निबंध लिहिण्यास सांगण्यात आला. निबंधात वापरलेले संदर्भस्रोत निबंधाखाली नमूद करायचे आहेत. निबंध ३०.९.२०२० पर्यंत ‘श्रीराम वाचन मंदिर’ येथे पाठवायचा होता.’


मंदिरांत चोरी न होणे आणि संरक्षणास प्राधान्य द्या !

‘प्रभु श्रीरामचंद्र यांनी स्थापन केलेल्या मिरजेच्या कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्‍वराच्या जीर्णोद्धारासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले आहे, अशी माहिती जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेवनंदगिरी महाराज यांनी दिली.’