रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. शिवराम शंकर परब, केरवडे (ता. कुडाळ), जि. सिंधुदुर्ग. 

अ. ‘आश्रम पाहून पुष्कळ समाधान वाटले. येथील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा चांगला होता.

आ. ‘हा आश्रम जणू काही श्रीविष्णु किंवा श्रीराम यांचे मंदिर आहे’, असे मला वाटत होते. येथे साधूसंत आणि देवता यांचे सूक्ष्मातून चांगल्या प्रकारे दर्शन झाले. संपूर्ण परिसरातील वातावरण सुगंधित होते.’

 २. श्री. सतीश भांडारकर, मु.पो. भोईचे केरवडे (ता. कुडाळ), जिल्हा सिंधुदुर्ग. 

अ. ‘आश्रम पहातांना प्रत्येक ठिकाणी ईश्वरी चैतन्याची अनुभूती आली. माझ्या मनाला पुष्कळ आनंद वाटला.

आ. ‘मी प्रत्यक्ष वैकुंठात आहे’, असे मला वाटत होते.

इ. आश्रमातील स्वागतकक्षात श्रीकृष्णाचे एक चित्र लावलेले आहे. त्या चित्रात ‘श्रीकृष्णाच्या हातात असलेले सुदर्शनचक्र प्रत्यक्ष फिरत आहे’, असे मला जाणवत होते.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक