काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथे ९ डिसेंबरला पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. टिकेन भागात ही चकमक झाली. अद्यापही येथे आणखी काही आतंकवादी लपले असण्याची शक्यता असल्याने येथे शोधमोहीम चालू आहे.